संग्राम घोडके यांनी जपला दातृत्वाचा वारसा..

दिनांक १४ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक संग्राम (भैय्या) घोडके यांनी आपले वडिल राजाराम (पाटील) घोडके यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून शहरातील पाच अंध बांधवांना वस्त्र दान केले.

श्रीगोंदा शहराचे पाटील म्हणून, राजाराम गंगाराम घोडके यांनी अनेक वर्ष काम केले. त्यांनी काटकसरीने कुटुंब सांभाळले. अल्पअवाधित आम्रपाली उद्योग समूहाची निर्मिती करून, नावारूपास आणला. सामाजिक बांधीलकी म्हणून, त्यांनी सामुदायिक विवाह सोहळा श्रीगोंदा शहरात घडवून आणण्यासाठी सक्रीय सहभाग घेत असत. त्यांनी समाजाचे आर्थिक हित जपण्याचा प्रयत्न केला. त्यांचाच विचाराचा वारस संग्राम घोडके पुढे चालवत आहेत. याचा सर्वांना अभिमान वाटत आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

त्यांच्या या उपक्रमात श्रीगोंदा नगरपालिकेचे (माजी नगराध्यक्ष) भागदचंद घोडके यांनीही सहभाग नोंदविला. त्यांचे याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या कार्यक्रमासाठी (माजी नगराध्यक्ष) भागचंद घोडके, (माजी उपनगराध्यक्ष) अशोक खेंडके, (नगरसेवक) संतोष खेतमाळीस, शहाजी (भाऊ) खेतमाळीस, निसार भाई बेपारी, अविनाश घोडके सह हृदय घोडके आदि उपस्थित होते.

स्रोत:(सतीश ओहोळ सर,लिंपणगाव)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading