#श्रीगोंदा..यश अपयशाला जी मानसं घाबरत नाहीत.. त्यांचीच इतिहास नोंद घेतो: प्रदीपदादा सोळंके..

दिनांक १४ फेब्रुवारी, श्रीगोंदा

श्रीगोंदा शहरातील शेख महमंद बाबा दर्गाच्या बाहेरील प्रांगणात दिनांक १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान सुरू असलेल्या विचार प्रबोधन सप्ताहाचा आजचा तिसरा दिवस. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज प्रमुख वक्ते म्हणून, प्रदीपदादा सोळंके (ज्येष्ठ विचारवंत) यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी शहाजीराजे भोसले यांच्या जीवन चरित्रासह इतिहासावर प्रकाश टाकला. इतिहासातील वेगवेगळे संदर्भ स्पष्ट करत, त्यांनी शहाजी राजांच्या ऐतिहासिक घटना यावेळी नमूद केल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय कदम तर, उद्घाटक प्रहार संघटनेचे (जिल्हाध्यक्ष) विनोद भाऊ परदेसी हे होते. याप्रसंगी प्रस्ताविक Ad. संभाजीराव बोरुडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप खामगळ व संतोष इथापे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुकुंद सोनटक्के यांनी केले.

यावेळी प्रवीण दादा सोळंके यांनी आपल्या प्रमुख भाषणात नमूद केले की, अहमदनगरच्या निजाम विरोधात विजापूरचा आदिलशहा व दिल्लीचा मोगल या दोन शक्ती एकत्र आल्या होत्या. या दोघांनीही निजामावर आक्रमण केले होते. अशा परिस्थितीत ही धर्माची लढाई असू शकत नाही. ही सत्तेची लढाई होती. असे मत त्यांनी यावेळी मांडले. शहाजी राजांचा इतिहासावर बोलत असतांना त्यांनी सांगितले की, शहाजी राजांचा प्रताप पाहून, पराभूत होऊन सुद्धा आदिलशहाने त्यांना राजपुत्राचा दर्जा दिला होता. म्हणून, शहाजी राजांनी बंगलोरला जाऊन तेथेही मोठा इतिहास घडविला आहे. त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा दरबार निर्माण केला. स्वतः ते तेथील जनतेला न्याय देऊ लागले. समाज कल्याणाची कामे करू लागली. छत्रपती शिवाजी महाराज व शहाजी महाराजांच्या जीवनामध्ये अनेक वेळा यश, अपयश आले. तरी, ते खचून गेले नाहीत. त्यामुळे आपणही यश अपयशाची परवा न करता, मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. यश अपयशाला जी मानसं घाबरत नाहीत.. त्यांचीच इतिहास नोंद घेतो. अशेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. Ad. संभाजीराव बोरुडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक वर्षापासून पुरोगामी जवळच काम करणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. सबंध महाराष्ट्रभर फिरून महापुरुषांची उंची ते सांगतात. अशा लोकांना नाव ठेवले जातात. महात्मा फुले यांचे उदाहरण देताना त्यांनी मांडले कि, महात्मा फुलेंचे मोठेपण त्यांच्या हयातीत कळले नाही. त्यांच्या चुलत नातवाने त्यांच्या बनत असलेल्या पुतळ्याला विरोध केला होता. जनतंत्रची निर्मिती करणाऱ्या बाबासाहेबांनाही प्रवर्गातील लोकांनी निवडणूकीमध्ये पाडले होते. अशा पद्धतीने महापुरुषांनाही विरोध झाला आहे. यापुढे बोलतांना सांगितले की, भांडारकर प्रकरणात कुण्या भोसलेला राग आला नाही. तर, अठरापगड मावळ्यांना राग आला आणि भांडारकरचा बंदोबस्त करीत, जिजाऊंची बदनामी त्यांनी थांबवली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आपल्या वक्तव्यात जिजाऊंची महती सांगताना त्यांनी सांगितले की, जनसेवा करतांना शहाजीराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर जिजाऊला धर्म प्रथेप्रमाणे सती जाणे अनिवार्य होते. त्यावेळच्या धर्ममार्तंडांनी जिजाऊला सती जाण्यासाठी सांगतले. मात्र, माझ्या पतीसह माझे स्वप्न आहे की, मला या जनतेचे राज्य निर्माण करायच आहे. आणि ते स्वराज्य जोपर्यंत निर्माण होत नाही. तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही. जा.. मी.. आसल्या धर्मग्रंथाला लाथ मारते, जे मला सती जा म्हणते. असे जिजाऊ ने तत्कालीन धर्माच्या ठेकेदारांना ठणकावून सांगितले. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर अकरा दिवसांनी जिजाबाईंचा मृत्यू झाला. बाबत भाषणात बोलतांना सोळंके यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये विजयराव चव्हाण यांनी सर्व महापुरुषांच्या विचारावर चर्चा करीत, त्यांचे विचार सर्वांसमोर मांडले. शिवाजी महाराजांची महती त्यांनी यावेळी सांगितली. उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी श्रीगोंदा नगरपालिकेचे (नगरसेवक) सतीश मखरे (संभाजी ब्रिगेडचे) नानासाहेब शिंदे, अरविंद कापसे, प्रशांत शेलार, सुनील ढवळे, (पत्रकार) राजू शेख, (संपादक) अमीनभाई शेख, (पत्रकार) शकील भाई शेख, हभप बाळासाहेब धोत्रे महाराज, गणेश काळे, हभप बाळासाहेब धोत्रे महाराज, Ad. महेश लोणकर, बापू माने, संतोष इथापे, प्रदीप खामगळ, मुकुंद सोनटक्के, राजेंद्र औटी, बाळासाहेब दांडेकर, विनोद उजागरे, प्रमोद उजगरे, हनुमंत माने, प्रशांत लांडगे, गोरख घोडके, साहेबराव रासकर, राजेंद्र पोकळे, सुरेश गलांडे, सुरेश सुपेकर सह आयोजन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

स्त्रोत:(दिनांक १४ फेब्रुवारी रोजी आयोजित विचार प्रबोधन सप्ताह कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading