दिनांक १४ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा शहराध्यक्षपदी प्रवीण धुमाळ यांची तर, सागर हिरडे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी प्रविण दादांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेला सक्रिय संघटन म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मार्फत चांगले सामाजिक कार्य चालू आहे. याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष आणि भावी जिल्हाध्यक्ष शिवश्री अरविंद कापसे यांच्या वडिलांच्या नावाने शिवश्री विठ्ठलराव कापसे वाचनालय या ठिकाणी प्रवीण दादा गायकवाड यांनी भेट दिली. या वाचनालयाच्या उभारणीसाठी प्रवीण दादा गायकवाड यांचे मोलाचे योगदान आहे. या भेटीदरम्यान वाचनालयातील मुलांचे सीआयएसएफ, इंडियन आर्मी, बीएसएफ, आसाम रायफल्स, आयटीबीपी इत्यादी क्षेत्रात सिलेक्शन झाले आहे. या विद्यार्थ्यांचा प्रवीण दादा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी रा.काॅ.यु. जिल्हाध्यक्ष प्रवीण भैय्या शेलार, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नाना शिंदे, तालुका कार्याध्यक्ष सुनीलराव ढवळे, गणेश पारे, मयूर आढाव, अनिकेत धुमाळ, आदेश धुमाळ, सुरज शिंदे ,गणेश ससाने, नवनाथ जगताप व वाचनालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
स्रोत:(नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेड,श्रीगोंदा)
