दिनांक ५ जानेवारी, श्रीगोंदा:
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व फुले ब्रिगेडच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. (राज्य साखर संघाचे संचालक) घनःशाम शेलार, (हरियाणा राज्यातील गृहरचना विभागाचे संचालक) मकरंद खेतमाळीस, (राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिक्षक) भाग्यश्री खेतमाळीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी आकाश रासकर आणि गोरख आळेकर यांनी बनविलेल्या समता सारथी या माळी समाज वधु वर ई बुकचे प्रकाशन हरियाणा राज्यातील गृहरचना विभागाचे संचालक मकरंद खेतमाळीस यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्यांदाच राज्य शासनाने महिला शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शारदा विद्या मंदिर श्रीगोंदा येथील प्रथम शिक्षिका ते मुख्याध्यापक पदावर कार्य करणार्या रजनी सप्तर्षी यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिक्षक भाग्यश्री खेतमाळीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. घुगल वडगाव येथील स्नेहालय वसतीगृह व घारगाव येथील महात्मा जोतिराव फुले आश्रम शाळेतील मुलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
(जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष) बाबासाहेब भोस, अॅड. संभाजीराव बोरूडे, (नगराध्यक्षा) शुभांगीताई पोटे, (उपनगराध्यक्ष) रमेश लाढाणे, (ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष) अमर घोडके, (शिवसेनेचे तालुका प्रमुख) बाळासाहेब दुतारे, संजय डाके, बापु गोरे, शहाजी खेतमाळीस, संतोष खेतमाळीस, संतोष क्षीरसागर, संतोष कोथिंबिरे, सीमा गोरे, एम.डी. शिंदे, (नगरसेवक) संग्राम घोडके, सुनिल वाळके, सतिष मखरे, दीपक शिंदे, संतोष रायकर, अंबादास औटी, फक्कड मोटे, अशोक खेंडके, मच्छिंद्र शिंदे, दिपक शिंदे, अॅड प्रशांत गोरे, जितेंद्र काळे, संदिप आनंदकर, बंडुपंत कोथिंबिरे, शिवाजी राऊत, विकास गोंधळी, (पत्रकार) राजमहमंद शेख, (फुले ब्रिगेड जिल्हाध्यक्ष) संध्या रसाळ, (फुले ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष) आशा साबळे, प्रतिभा गांधी, जयश्री वराडे, श्रध्दा वराडे, बापु रसाळ, बाप्पु माने, संजय आनंदकर इत्यादी पदाधिकारी व समाज बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते.
स्रोत:(गोरख आळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
