(सचिव) दिलीप डेबरे यांच्यावर कारवाईचे निर्देश.

दिनांक १२ जुलै,श्रीगोंदा:

गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंद्याचे सचिव दिलीप डेबरे हे एकाधिकारशाही वापरत समितीतील सदस्यांना अथवा संचालकांना विचारात न घेता, अनागोंदी कारभार करीत असल्या विषयीचे तक्रार/निवेदन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था अहमदनगर) यांना दिले होते. त्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत दिलीप डेबरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था अहमदनगर) दिग्विजय आहेर यांनी दिल्याचे समजते आहे.

दिलीप डेबरे (सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विद्यमान अधिनियम १९६३ व नियम १९६७ तसेच मंजूर उपविधी व सेवा नियमनातील तरतुदीनुसार कारवाई करावी, त्याचबरोबर डेबरे यांनी स्वतःचे वाढवुन घेतलेले वेतन ज्याच्यामुळे श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला सोसावे लागलेले आर्थिक नुकसान व्याजासह दिलीप डेबरे यांचेकडून एकरक्कमी वसूल करावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत.

नमूद अहवाल ३० दिवसांत जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था अहमदनगर) यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा यांनी सादर करावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी दिरंगाई झाल्यास श्रीगोंदा बाजार समितीच्या सदस्या विरुद्ध उचित कारवाई करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

दिलीप डेबरे (सचिव) यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात संचालकांपैकी काहींनी तक्रारी अर्ज, पत्र तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांचा चौकशी अहवाल, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे सुनावणी नोटीस, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा यांच्यामार्फत सादर केलेला लेखी खुलासा, उमेश निवृत्ती पोटे (संचालक) कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा यांनी सादर केलेला लेखी खुलासा सह दिलीप डेबरे (सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा) यांनी सादर केलेला लेखी खुलासा, या सर्व संदर्भांवरून जिल्हा उपनिबंधक यांनी सदरील निर्देश दिल्याचे समजते आहे.

स्रोत:(जिल्हा उप निबंधक, अहमदनगर, यांचे निर्देश दिलेले पत्र व मिळालेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading