दिनांक १२ जुलै,करमाळा:
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावरती तोडफोड करणाऱ्या समाज कंटकावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, या मागणीचे पत्र राजाभाऊ कदम (जिल्हा अध्यक्ष बहुजन संघर्ष सेना, सोलापूर) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे. सदर निवेदन तहसीलदार समीर माने यांनी स्विकारले आहे.
पुस्तकासाठी घर बांधनारे जगात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे एकच माहामानव आहेत. राजगृह हे जगाचे प्रेरनास्थान आहे. आंबेडकरी जनतेचा आत्मा आहे. देश विदेशातील लोक राजगृह पाहण्यासाठी मुंबई दादर येथे भेट देतात. आशा पवीत्र राजगृहावरती अज्ञात समाज कंटकाणी तोडफोड केली. हि देशद्रोही घटना आहे. सदर इसमाला अटक करून, त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई करावी, राजगृहावरती कायम चोवीस तास पोलिस बंदोबस्त ठेवावा, आंबेडकर कुटूंबियांना पोलिस बंदोबस्त पुरवावा, महाराष्ट्रात वारंवार अनुसूचित जाती/जमाती, बौध्द समाजावर हल्ले होतात. एका घटनेचा निषेध करेपर्यंत दुसरी घटना घडते, आंबेडकरी जनतेने नुसता निषेधच करायचा का? यापुढे अशा घटना घडू नयेत. याची दखल शासनाने घ्यावी. अशी घटना घडल्यास आंबेडकरी जनता कोरोना विषाणूची पर्वा न करता, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. याची शासनाने दखल घ्यावी. सध्या कायदा सुव्यवस्था पुर्ण ढासळला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतः यात लक्ष घालावे.असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी (तालुकाध्यक्ष) अंगद लांडगे, (जिल्हा सचीव) दादा चव्हाण, (तालुका सचीव) मारुती भोसले, (तालुका युवक अध्यक्ष) उत्तम गायकवाड, (करमाळा शहर अध्यक्ष) आजीनाथ कांबळे, (शहर सचीव) कालिदास कांबळे, दशरथ खंकाळ आदी कार्येकर्ते उपस्थित होते.
(स्रोत:राजाभाऊ कदम यांनी दिलेले निवेदन)
