पत्नीच्या मोबाईल मधील अश्लील फोटो पाहून.. पती गेला घर सोडून. श्रीगोंदा शहरातील घटना…

दिनांक १७ जुलै,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरात वास्तव्य असणाऱ्या एका २४ वर्षीय महिलेला लोणी काळभोर येथील एका युवकाने मोबाईलद्वारे अश्लील फोटो व व्हिडीओ पाठवून ते सामाजिक माध्यमातून व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला छेडल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, हा प्रकार यावरच थांबलेला नसून, पाठवलेले ते अश्लील फोटो व व्हिडीओ थेट या महिलेच्या पतीने पाहिल्यानंतर तो पती त्या महिलेला व मुलीला सोडून त्याच्या मूळ गावी सिडको, नाशिक येथे निघून गेला आहे.

याबाबत पीडित महिलेने लोणी काळभोर येथील त्या नराधमा विरोधात तक्रार दिली असून, त्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा शहरात एका ठिकाणी राहत असलेल्या महिलेला लोणी काळभोर येथील त्या मुलाचे लग्नासाठी मागने आले होते. लग्नात पसंती झाली मात्र, विवाहातील रीतीरिवाज पूर्ण करू न शकल्याने (दागिने, हुंडा, पैसे, गाडी) तो विवाह होऊ शकला नाही. त्यानंतर त्या महिलेचा विवाह सिडको, नाशिक येथील एका युवकाशी झाला. त्यापासून तिला एक अपत्तेही झाले. त्यांचा संसार सुखाने चालू असतानाच अचानक काही महिन्यांपूर्वी लॉकडाऊन कालखंडामध्ये नमूद लोणी काळभोर येथील (विवाह मोडलेला) तो इसम या महिलेला अश्लील फोटो व व्हिडीओ पाठवून त्रास देऊ लागला. पाठवलेले हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या पतीने बघितल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि तो पत्नी व मुलीला सोडून त्याच्या मूळ गावी सिडको येथे निघून गेला.

याबाबत महिलेने श्रीगोंदा तसेच लोणी काळभोर येथे तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर येथील त्या इसमाविरोधात भादवि कलम ३५४ (अ), ५०६, ५०७, व माहिती, तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम २००८ चे ६६ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी याच इसमाने सदर महिलेबरोबर शारीरिक संबंध केल्याल्याबाबत पीडित महिलेने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचे समजते आहे.

(स्त्रोत: श्रीगोंदा पोलीस स्टेशन मधून मिळालेली माहिती)

Leave a Reply