“महाराणी अहिल्याबाई होळकर समाज प्रबोधन मंच”च्या तालुकाध्यक्षपदी उत्तम मदनेंची निवड व तालुका कार्यकारणी जाहीर..

दिनांक २० जुलै,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील सामाजिक कार्यकर्ते उत्तम मदने यांची “महाराणी अहिल्याबाई होळकर समाज प्रबोधन मंच”च्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, संघटनेमार्फत तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष महादेव सोन्नर यांच्या उपस्थितीमध्ये तालुकाध्यक्ष सह तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तळा गळातील समाज बांधवांसाठी काम करणे हे संघटनेचे उद्देश असून, धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गात आरक्षण मिळावे या ध्येय धोरणाने संघटना कार्यरत असणार असल्याचे तालुकाध्यक्ष मदने यांनी माध्यमांना सांगितले आहे.

वेगवेगळ्या आंदोलनांसह प्रशासकीय पाठपुरावा करणे तसेच सामाजिक चळवळ गतिमान करीत समाजाला मुख्य प्रवाहात आणने हे या संघटनेचे मूळ उद्देश आहे. समाज प्रबोधन करीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी संघटना संघर्ष करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

महाराणी अहिल्याबाई होळकर समाज प्रबोधन मंचच्या (तालुका अध्यक्षपदी) उत्तम पोपटराव मदने,(उपाध्यक्षपदी) धनराज कोरडकर, (तालुका सचिवपदी) शिवाजी टेंगले, (तालुका सचिवपदी) संदीप खरात, (तालुका संपर्क प्रमुखपदी) आदेश शेंडगे, (तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी) विजय मासाळ तर सागर कोरडकर, बाळासाहेब हंडाळ, अंबादास कारंडे, प्रवीण कोरडकरभाऊसाहेब कारंडे यांची तालुका सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे.

याबरोबरच महेंद्र शेंडगे यांची (तालुका अध्यक्ष युवक आघाडी), सुनील महारनुर (तालुका उपाध्यक्ष युवक आघाडी) अमोल सरक, (तालुका सचिव युवक आघाडी) नंदराम खरात, (तालुका सहसचिव युवक आघाडी) विशाल चोरमले, (तालुका संपर्कप्रमुख युवक आघाडी) योगेश कारंडे, (तालुका सोशल मीडिया प्रमुख युवक आघाडी) तर सुधीर कोरडकर, शहाजी सरक, चेतन कोरडकर, अनिल कोरडकर सह राहुल थोरात यांची (तालुका सदस्य युवक आघाडीपदी) नेमणूक करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल शुभेच्छा देत (जिल्हाध्यक्ष) महादेव सोन्नर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना संघटनेमार्फत पुढील सामाजिक कार्यास सदिच्छा दिल्या आहेत.

(स्त्रोत: उत्तम मदने यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading