निस्वार्थी भाई
महाराष्ट्राच्या विधीमंडळातील ज्येष्ठ सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा लढवय्या, शेतकऱ्यांचा भाई …
भाईंचा जन्म मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावी १० ऑगस्ट १९२७ रोजी झाला . त्यांचे प्राथमिक ते एलएलबी पर्यंतचे शिक्षणाचा प्रवास पेनूर, पाटकुल, पंढरपूर, पुणे असा झाला.
३ ऑगस्ट १९४७ रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. १९४८ मध्ये पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना गोविंदराव बुरगुटे, एस.एम.पाटील, एल.बी. कुरकुरे , डॉ . आप्पाराव पवार यांच्यारी देणारासमवेतच शेकाप विद्यार्थी सभा स्थापन केली . शेकापने सुरु केलेल्या जनसत्ता या अंकाची विक्री केली . भाई शंकरराव मोरे , कॉ . मालिनीताई तुळपुळे , व कॉमेड भागवत यांच्याकडे गणपतरावांनी धडे गिरवले .
१९५७ मध्ये एलएलबीची सनद मिळाली. त्यानंतर बुध्देहाळ प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांनी गणपतरावांना कायदेशीर लढा देण्यासाठी आग्रह धरला. तालुक्यातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी १९५९ साली शेतकरी कामगार पक्षाचे खासदार क्रांतीसिंह नाना पाटलांच्या अध्यक्षतेखाली सांगोले येथे पाणी परिषद आयोजित केली . कृष्णा पाणी तंटा लवादाच्या १९७५ च्या निर्णयानंतर मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १३ ऑगस्ट १९ ७५ रोजी पाणी परिषद घेतली . महाराष्ट्र विधानसभेचे त्यावेळचे विरोधी पक्षनेते आमदार भाई गणपतराव देशमुख या पाणी परिषदेचे स्वागताध्यक्ष होते . या पाणी परिषदेमध्ये कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या पाण्यापैकी ३० ते ४० टीएमसी पाणी सांगोला , मंगळवेढा , जत , आटपाडी , कवठेमहांकाळ , मिरज , विटा , खानापूर , तासगांव या तालुक्यांना देण्याचा विचार पहिल्यांदा झाला . २६ जुलै १९९५ रोजी पासून दरवर्षी शेतमजूर , शेतकरी संघटना वतीने क्रांतीवीर जगन्नाथअण्णा नायकवाडी , आमदार गणपतराव देशमुख , डॉ . बाबुराव गुरव , डॉ.भारत पाटणकर व अन्य कार्यकर्त्यांनी लढा सुरुच ठेवल्याने प्रकल्प गतीमान झाला . १९६२ मध्ये पंढरपूर येथे शेकापचे अधिवेशन भरविले . एस.एम.पाटील , सर्जेराव सगर , विश्वासराव फाटे , मुरलीधर थोरात यांच्या सहकार्याने अधिवेशन यशस्वी पार पडले . गणपतराव देशमुख यांनी १९६२ मध्ये प्रथमच सांगोला मतदारसंघातून विधानसभा लढविली . त्यांनी विजयही मिळविला .१९९५ साली महिलांना काम मिळावे यासाठी शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीची नोंदणी केली . पुढील काळात दोन्हीही उद्योग सुरु झाले . १९६२ पासून आजपर्यंत दोन वेळचा अपवाद वगळता सांगोल्यातील जनतेचे प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेत भाई करत आहेत . १९६२ , १९६७ , १९७४ , १९७८ , १९८० , १९८५ , १९९० , १९९९ , २००४ , २०० ९ , २०१४ या निवडणुकांमधून ते तब्बल ११ वेळा सांगोला मतदारसंघातून निवडून आले . हा एक विक्रमच म्हणावा लागेल .
१९६९ पासून ते आजतागायत ते सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत . १९७२ ते १९७५ या काळात महाराष्ट्र राज्य परिवह महामंडळाचे सदस्य होते . १९७५ ते ८० या काळात विधानसभेच्या विरोधी पक्षनेते होते . १९७८ ते १९८० मध्ये पुरोगामी लोकशाही दल सरकारच्या कालावधीमध्ये कृषी व ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री होते . त्यावेळी कृषी मंत्री म्हणून शेतक – यांची १२७ कोटी रुपयांची बंडीगची कर्जे त्यांनी माफ केली . १९८० ते १९८२ या कालखंडात ते लोकलेखा समितीचे प्रमुख होते . १९९० ते २००४ मध्ये तत्कालीन राज्यपाल महोदयांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली . त्यानंतर १९९९ ते २००२ मध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये पणन व रोजगार हमी खात्याचे कॅबीनेट मंत्री होते .
प्रा. नानासाहेब लिगाडे, चेअरमन, शेतकरी सहकारी सूत गिरणी मर्यादित, सांगोले, जि.सोलापूर
स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)
