श्रीगोंद्यातील या शासकीय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप: ॲड. संभाजी बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली १० फेब्रुवारीला जनआंदोलन सभा..

दिनांक ४ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

तहसीलदार श्रीगोंदा यांच्यावर ख्रिश्चन धर्मदाय संस्थेची जमीन बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे तक्रारदार संस्थेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.

या प्रकरणी अन्यायग्रस्त संस्थेने १२ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप केला जात आहे. गुन्हा दाखल असतानाही आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जांना मान्यता मिळाल्यामुळे हा प्रकार अधिक चर्चेत आला आहे.

संविधान रक्षणासाठी व भ्रष्टाचाराविरोधात जनतेच्या आवाजासाठी सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता तहसील कार्यालय आवारात जनआंदोलन सभा आयोजित करण्यात आली आहे. ॲड. संभाजी बोरुडे (आप्पा) व संविधान बचाव सहकारी कार्यकर्त्यांनी जनतेला मोठ्या संख्येने सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

स्रोत:(जाहीर आवाहन)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading