जनता कला व विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांचे विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न…

दिनांक ४ फेब्रुवारी २०२५, मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर..:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अ.नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज आणि जनता कला व विज्ञान महाविद्यालय, रुईछत्तीस तसेच राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मांडवगण, ता. श्रीगोंदा येथे सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून मा. आर. आर. कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर करंडे होते. समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय एम. एम. तांबे सर उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अ.नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त माननीय मुकेश दादा मुळे होते.

ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या शिबिराला मांडवगण गावच्या सरपंच माननीय सुलभाताई सदाफुले, सुभाष जी शिंदे, बाबावाडी महाविद्यालयाचे प्राचार्य रसाळ सर आणि शिवचरण घोडके यांची उपस्थिती लाभली.

शिबिराच्या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, समाज प्रबोधन कार्यक्रम आणि विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने यांचा यामध्ये समावेश होता. या उपक्रमांमुळे ग्रामस्थांमध्ये सामाजिक जाणिवा जागृती निर्माण झाली.

Advertise..

जनता कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्टाफने या शिबिरासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिबिराचा समारोप हर्षोल्लासात संपन्न झाला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading