राजे उमाजी नाईक यांच्या १९३ व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव सुद्रिक येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न..

दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ पारगाव सुद्रिक, ता. श्रीगोंदा:

भारताचे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या १९३ व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव सुद्रिक येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, सर्व विद्यार्थी तसेच विशेष मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पणाने झाली. या वेळी सुधीर भोईटे (जय मल्हार क्रांती संघटना, युवक जिल्हा उपाध्यक्ष, अहील्यानगर दक्षिण), विजय शिंदे (जय मल्हार क्रांती संघटना शाखा पारगाव सुद्रिक) आणि संजय पांढरे सर यांनी राजे उमाजी नाईक यांच्या क्रांतिकारक कार्यावर मनोगत व्यक्त केले.

वक्त्यांनी उमाजी नाईक यांच्या विचारांचे महत्त्व विशद करत आजच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनीही देशभक्तीपर गीतं सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी प्रतिमा अभिवादन करत समाजाला प्रेरणा देणाऱ्या उमाजी नाईक यांच्या कार्याचे स्मरण केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या शिक्षकांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading