तीव्र उन्हाळा व लॉकडाऊनच्या संकटकाळी शंभुसेना संघटनेची वृक्ष संवर्धन मोहीम..

दिनांक ५ मे(पेडगाव,श्रीगोंदा):

तीव्र उन्हाळ्याची दाहकता व सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडावरील (बहादूरगड) वृक्षांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन, शंभुसेना संघटनेच्या माध्यमांतून वृक्षांना पाणी देत संर्वधन करण्यात आले.

स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजांच्या तेजस्वी इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले धर्मवीर गडावर (बहादूरगड) विविध माध्यमांद्वारे दरवर्षी वृक्षांची लागवड केली जाते व त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो.तरी,देखील उन्हाळ्यात सर्व झाडांचे संवर्धन करणे खूपच जिकरीचे होते.यामुळे सर्व माध्यमे आप – आपल्या परीने संवर्धनाचे प्रयत्न करत असतात. याचाच एक भाग म्हणून शंभुसेना सामाजिक संघटनेच्या वतीने ऐन उन्हाळ्यासह लॉकडाऊन काळात वृक्ष संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या सामाजिक कार्यात(शंभुसेना संघटना प्रमुख) दिपक राजेशिर्के,(प्राध्यापक) शिवाजी क्षिरसागर (सर), लक्ष्मीकांत राजेशिर्के, श्यामकुमार काराळे (सर), परशुराम खळदकर, नवनाथ क्षिरसागर , तेजस काराळे , प्रणव क्षिरसागर आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading