दिनांक १८ ऑगस्ट,श्रीगोंदा:
आशिया खंडात नावलौकिक असणाऱ्या रयत शिक्षण संस्था, सातारच्या समन्वय समिती वर शिक्षक प्रतिनिधी म्हणून, श्री. शिवदास संपत आखाडे यांची निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील, दलित मित्र दादा पाटील व रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणावर निस्सीम श्रद्धा व विद्यार्थी प्रिय श्री. आखाडे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या काष्टी, आढळगाव, अळकुटी, आश्वी, गोधेगाव, या विद्यालयात मराठी विषयाचे आध्यापनाचे कार्य केलेले असुन, सध्या ते महात्मा गांधी विद्यालय कर्जत येथे कार्यरत आहेत.
त्यांनी संस्था व शासन स्तरावर अनेक प्रशिक्षणात सहभाग नोंदवून ते पूर्ण केले आहेत. सर्व शिक्षा अभियान सेंवार्तगत केंद्र संमेलनाचे तज्ञ मार्गदर्शक एस.एस.सी. बोर्ड मराठी विषय तज्ञ मार्गदर्शक, नवनीत फौडेंशन मराठी विषय तज्ञ मार्गदर्शक इत्यादी विभागाचे काम पहात आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणाने प्रेरित होवून त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक विचार, कमवा व शिका योजनेचा विद्यार्थांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून दिले. सामाजिक व अंधश्रद्धा निर्मुलन या विषयी अनेक विद्यालयात व्याख्याने दिली.
त्यांना सन २०१९ मध्ये रोटरी क्लब कर्जत ने आर्दश शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अशा उल्लेखनीय कामाची दखल संस्थेने घेतल्या बद्दल रयत शिक्षण संस्थेचे श्री. आखाडे यांनी आभार मानले आहेत. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
स्रोत:(सतीश ओहोळ, सर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
