धक्कादायक: फॉर्च्युनर कारमधील ५ ते ६ जणांचा दिग्विजय नागवडे यांच्या स्कॉर्पिओवर हल्ला; वाकड हायवेवर वाहनाची तोडफोड..!

दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ पिंपरी-चिंचवड/श्रीगोंदा:

वाकड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिग्विजय राजेंद्र नागवडे यांच्या स्कॉर्पिओ (एम.एच. १२ यू.व्ही. २५२५) गाडीचा पाठलाग करून फॉर्च्युनर (एम.एच. १४ एच.सी. १८८१) कारमधील ५ ते ६ अनोळखी इसमांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात नागवडे यांच्या स्कॉर्पिओ गाडीची पुढील आणि मागील काच फोडून मोठे नुकसान करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९:०० ते ९:३० वाजेच्या सुमारास तक्रारदार दिग्विजय राजेंद्र नागवडे हे भुमकर चौकाजवळील हायवेवरील बसस्टॉपजवळ ट्रॅफिकमध्ये थांबले होते. त्याचवेळी फॉर्च्युनर कार (एम.एच. १४ एच.सी. १८८१) त्यांच्या पाठीमागे येऊन थांबली. नागवडे यांनी घाबरून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता, फॉर्च्युनर कारने त्यांना ओव्हरटेक केले आणि वाकड ब्रीजखाली हायवेवर रात्री ९:३० च्या सुमारास गाडी आडवी लावली.

फॉर्च्युनर कारमधून ५ ते ६ अनोळखी इसम खाली उतरले. त्यांच्या हातात लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड होते. त्यांनी रस्त्यावर आडवे उभे राहून नागवडे यांची कार थांबवली. यावेळी त्यांनी नागवडे यांना शिवीगाळ करत त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात गाडीच्या पुढील आणि मागील काचा फोडून मोठे नुकसान करण्यात आले.

या हल्ल्यापूर्वी फॉर्च्युनर कार डेकॅथलॉन समोरील सर्व्हिस रोडवरून गेल्याचे नागवडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हल्लेखोरांनी पोलिसांत तक्रार केल्यास “तुला सोडणार नाही,” अशी धमकी देऊन घटनास्थळावरून पोबारा केला.

दिग्विजय राजेंद्र नागवडे यांनी या घटनेबद्दल अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे आणि फॉर्च्युनर कारच्या नंबरच्या (एम.एच. १४ एच.सी. १८८१) आधारावर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading