दिनांक ६ ऑक्टोबर २०२५,जामखेड:
रस्त्यावर अचानक कुत्रे आडवे आल्याने नियंत्रण सुटून एक जीप उलटल्याची मोठी दुर्घटना जामखेड शहरालगत कर्जत रस्त्यावर रविवारी (५ ऑक्टोबर) घडली. या अपघातात जीपमधील तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातामध्ये जखमी झालेल्यांमध्ये जीपचालक अन्सार हसन शेख (वय ३६, रा. राजुरी, ता. जामखेड) यांच्यासह नजीर फकीर मोहम्मद सय्यद (वय ५०) आणि बाबा कादर शेख (वय ७२, दोघे रा. खडकत, ता. आष्टी) यांचा समावेश आहे. तात्काळ मदतीमुळे मोठी हानी टळली.

अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना तलाठी कार्यालयातील प्रवीण सरोदे आणि भाऊसाहेब पोटफोडे यांनी फोनद्वारे दिली.

कोठारी यांनी जराही विलंब न करता आपले सहकारी महेंद्र क्षीरसागर यांना सोबत घेऊन, त्यांच्या रुग्णवाहिकेतून तिन्ही जखमींना तात्काळ जामखेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
स्रोत:(ऑनलाईन माहिती)

Advertise..
