धक्कादायक!! श्रीगोंदा बस स्थानक स्वच्छतेसाठी बाल मजुरांचा वापर..

दिनांक २९ नोव्हेंबर,श्रीगोंदा:

श्रीगोंदा बस स्थानक पूर्णतः घाणीच्या विळख्यात सापडले असून, कोरोना प्रादुर्भावा दरम्यान अशा पद्धतीची अस्वच्छता आणि घाणीचे सावट साधारण माणसास प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणार आहे. यातच श्रीगोंदा बसस्थानकातील स्वच्छतेचे काम अल्पवयीन किंवा लहान मुलांकडून करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

बस स्थानकातील स्वच्छतेचे कामकाज कोरोना प्रादुर्भावापूर्वी एका खाजगी कंपनीकडे होते. दरम्यान कालखंडात कमीतकमी तक्रारी नमूद होत्या. मात्र, कोरोना लॉकडाऊनमध्ये संबंधित कामकाज बंद झाल्यानंतर श्रीगोंदा आगाराचे आगार व्यवस्थापक स्वच्छतेचे कामकाज कामचलाऊ पद्धतीने हाती घेत असल्याचे निदर्शनास येत आहेत. यासाठी ते बालमजुरांचा वापर करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

स्थानकातील शौचालयाचा प्रश्न तसेच बस थांब्यावरील प्रवाश्याकडून होणारी अस्वच्छता, आसपासच्या परिसरात असलेल्या दुकानांतुन बस स्थानकावरील कुंड्यांमध्ये पडणारा कचरा, शेजारी असलेल्या कसाईवाड्यातील घाण, चिकन, मासे विक्रीच्या माध्यमातून होणारी घान श्रीगोंदा बस स्थानकाच्या शेजारी लावलेल्या कुंड्यांमध्ये पडत असून, यातून निघणारी दुर्गंधी आणि प्रवाशांकडून होणारी घाण या सर्वांची स्वच्छता करण्यासाठी श्रीगोंदा बस स्थानक प्रशासनामार्फत अल्पवयीन किंवा लहान मुलांना पुढे केले जात आहे.

स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासन तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी बालकामगार किंवा अल्पवयीन, लहान मुलांकडून होणाऱ्या कामाबाबत श्रीगोंदयात विशेष लक्ष घालून, संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.

स्तोत:(मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading