श्रीगोंद्यात हादरवणारी घटना: राजकीय वादातून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला.! हात निकामी..

श्रीगोंदा (दि. ११ जुलै २०२६):

(विचलित करणारा फोटो..)

श्रीगोंदा मांडवगण रस्त्यावर, तांबोळी यांच्या म्हशीच्या गोठ्यासमोर आज दुपारी ३: ३०वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार तलवारीने अमानुष हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

या हल्ल्यात पीडित इसमाच्या हातावर, पोटावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून, हल्लेखोरांनी केलेले वार इतके भीषण होते की पीडिताचे हात निकामी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील पीडित आणि हल्लेखोर हे सर्वजण घुगल वडगाव येथील रहिवासी आहेत. दुपारी भररस्त्यात अचानक आलेल्या चार-पाच जणांच्या टोळक्याने संबंधित व्यक्तीला गाठले आणि पूर्ववैमनस्यातून थेट तलवारीने हल्ला चढवला. या हल्ल्यात पीडित इसम गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या दोन्ही गटांमध्ये अनेक वर्षांपासून राजकीय वर्चस्व आणि वादातून संघर्ष सुरू होता. या जुन्या वादातूनच हा हल्ला झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हल्ला केल्यानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत असून, परिसरातील सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading