श्रीगोंदयात पुन्हा ११ एप्रिल ते १३ एप्रिल ३ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर…

दिनांक १० एप्रिल,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नागरिकांना स्थानिक प्रशासनामार्फत पुन्हा एकदा तीन दिवसांच्या जनता कर्फ्यु विषयी आवाहन करण्यात येत आहे.

श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी याविषयी माध्यमांना माहिती दिली आहे. प्रसिद्धी पत्रात नमूद करण्यात आले आहे की,महाराष्ट्रात कोरोना बधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.नगर जिल्ह्यातही कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील काही तालुक्यात देखील कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.या सर्व बाबींचा विचार करता खबरदारीचा उपाय व आपल्या सर्वांची सुरक्षितता याला प्राधान्य देऊन श्रीगोंदा तालुका प्रशासनाने दिनांक ११/०४/२०२० ते दिनांक १३/०४/२०२० असे ३ दिवस जनता करफू संपूर्ण तालुक्यात जाहीर केला आहे.

या कालावधीत तालुक्यात फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल आणि हॉस्पिटल,खाजगी दवाखाने सुरू राहतील.इतर अत्यावश्यक सेवा किराणा, भाजीपाला, दूध , गॅस हे फक्त घरपोच सेवा देणे नेहमीप्रमाणे सुरू राहील. पेट्रोल ,डिझेल अत्यावश्यक सेवांना उपलब्ध राहील.

या कालावधीत कोणीही नागरिक हे अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाहीत.याची सर्वानी दक्षता घ्यावी, अन्यथा त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाईसाठी गुन्हे दाखल करण्यात येतील. असेही तहसीलदार माळी यांनी माध्यमां तुन प्रसिद्ध केले आहे.

पुरवठा विभागाचे स्वस्त धान्य दुकाने हे चालू असतील..

लाभार्थीनां वेळेत धान्य मिळणेचे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार लाभार्थी हे योग्य असे सामाजिक अंतर ठेवून,जनता कर्फ्यु दरम्यान स्वस्त धान्य दुकानातून आपले धान्य जाऊन येऊ शकतील.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading