दिनांक १० एप्रिल,श्रीगोंदा:
कोरोना साथीने अनेक वधू वरांची लग्नाचे स्वप्न तुटतांना दिसत आहेत. सगळीकडे लॉकडाऊन व संचारबंदीमूळे नियोजित लग्न तारखा पुढे ढकलाव्या लागत आहेत. असंच एक उदाहरण श्रीगोंदयात समोर आलं आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील नवरी आणि शिरूर तालुक्यातील नवरदेव, वधू आणि वर ह्या दोघांचा जिल्हा वेगळा, मर्यादित लोकांची परवानगी लग्नाला जरी असली,तरी जिल्हा बंदी आडवी आल्याने,ह्या वधू वरांचं लग्न पुढे ढकल्याशिवाय पर्याय राहिला नाही. शासनाने कडेकोट जिल्हाबंदीचे आदेश दिल्या मुळे,नगर जिल्ह्यातील लोकांना पुणे जिल्ह्यात जाण्यास बंदी झाली.
लग्न हे पुणे जिल्ह्यातिल शिरूर तालुक्यात असल्यामूळे जिल्हाबंदीचा अडसर आडवा आला आणि लग्नाचा दिवस उजाडला,आता करायचं काय? हा यक्ष प्रश्न समोर उभा.मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता लग्नाची तारीख पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नसल्याने लग्न तारीख बदलण्यात आली असल्याच समोर आले.
त्यामूळे नाराज झालेल्या वधू,वरांनी कोरोना विरोधातिल लढाई जिंकल्यावरच लग्न करण्याचं ठरवलं आहे. याप्रमाणेच ग्रामीण भागात लॉक डाऊनमूळे मुलगी पाहण्याचे कार्यक्रम ही पुढे ढकलण्यात येत असल्याच समोर येत आहे. कोरोना गेला, की मग पाहू अस अनेक पाहुणे मंडळी सांगताना दिसत आहेत.
(वृत्तसंस्था)
