दिनांक १० एप्रिल,मढेवडगांव :
म्हातारपिंप्री येथील ग्रामपंचायतच्या वतीने करोना महामारीच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, गावातील प्रत्येक कुटूंबाला हॅण्डवॉश व सॅनिटाझरचे वाटप करण्यात आले.तसेच संपूर्ण गावाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली.
यासाठी संदीप पोकळे यांनी ट्रॅक्टर देऊन सहकार्य केले.व गावातील अपंगाना अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू पोकळे यांच्या मार्फत किराणा सामानाचे वाटप करण्यात आले आहे.यावेळी बलभीम हिरडे, रमजान शेख, राजू महामुनी यांनी सहकार्य केले.शासनाच्या नियमाचे पालन करत अंतर ठेवुन,हे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे व आपली आणि कुटूंबाची काळजी घ्यावी. असे आवाहन सरपंच सुनिता आण्णासाहेब पुराणे, (उपसरपंच)लखन भाऊसाहेब शिरवाळे,प्राजक्ता नितिन वाबळे, युसूफ इस्माईल खान, सुभाष प्रकाश तावरे, राजनंदिनी ऋषिकेश वाबळे, लता सुहास शिसाठ, शहाजी नागनाथ हिरडे, मंदाकिनी विलास साळवे, ग्रामसेविका वर्षा पवार, दिलीप महामुनी,सविता ठोकळे यांनी केले.
