वाळकीतील अत्याचार घटनेचा “श्रीगोंदा दलित महासंघ” कडून निषेध व कारवाईची मागणी…

दिनांक ५ मार्च (श्रीगोंदा):

नगर तालुक्यातील वाळकी येथील मातंग समाजाच्या मतीमंद दिव्यांग महिलेवर,शेजारी राहणाऱ्या मराठा
समाजाच्या पोपट जगन्नाथ दांगडे या नराधमाने दिनांक २६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता अंधाराचा फायदा घेत,पीडितेचे तोंड दाबून तिच्यावर अमानुष अत्याचार केला.

यानंतर घडलेली घटना पीडितेच्या संबंधीतांनी आरोपीच्या घरच्यांना सांगितली असता,आरोपीच्या पत्नी व मुलाने उलट अत्याचारित कुटुंबालाच मारहाण करत,जीवे मारण्याची व गाव सोडून जाण्याची धमकी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार अत्याचारित मातंग समाजातील कुटुंब घाबरून जावून त्यांना गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे.हे कुटुंब हे अत्यंत गरीब असून घाबरलेल्या अवस्थेत आहे.यावेळी दलित महासंघाच्या श्रीगोंदा पदाधिकाऱ्यांनी तहसील प्रशासनास कारवाईसाठी निवेदन सादर केले आहे.

याप्रकरणी दिनांक ४ मार्च रोजी दलित महासंघाच्या श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नायब तहसिलदार मॅडम यांना निषेधाचे व कठोर कारवाईचे निवेदन सादर केले आहे.सदर निवेदन देते वेळी (जिल्हा उपाध्यक्ष) सलीम भाई सय्यद,(तालुकाध्यक्ष) चंद्रकांत सकट,(तालुका उपाध्यक्ष)प्रमोद शेंडगे,विराज साळवे सह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading