# श्रीगोंदा.. मयत सभासद वगळून नागवडे साखर कारखान्याने २१ हजार ५१४ सभासदांना मतदानासाठी पात्र ठरवावे: प्रा.तुकाराम दरेकर..

दिनांक २४ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे एकूण २२ हजार ७११ सभासद आहेत. त्यातील १ हजार १९७ सभासद मयत आहेत. हे मयत सभासद वगळून राहिलेले २१ हजार ५१४ सभासद अंतिम मतदार यादीत समाविष्ट करावेत. अशी ठाम मागणी प्रारूप यादीवरील दि.२५ फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या हरकतीवरील सुनावणीच्या वेळी आपण मांडणार आहोत. असे श्रीगोंदा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी सांगितले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

नागवडे सहकारी साखर कारखान्याने व्यक्तिगत सभासदांचे आणि सोसायटी सभासदांचे क्रियाशील आणि अक्रियाशील हे केलेले वर्गीकरण चुकीचे आणि बेकायदेशीर आहे.

प्रा.दरेकर म्हणाले की, पुण्याच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांनी भवानीनगर साखर कारखान्यामध्ये मयत सभासद वगळून बाकीचे थकबाकीदारांसह सर्व सभासद अंतिम मतदार यादीत घेतले होते. दि.२४ जानेवारी २०२० रोजी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी एका वृत्तपत्रात बातमी देऊन भवानीनगरच्या मतदार यादीला दुजोराही दिलेला आहे. त्याप्रमाणेच आता नागवडे सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी करण्यात यावी.

नागवडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने दि.३० नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या सभेच्या ठराव नंबर ६ (१) ने पाच वर्षे कालावधीतील ऊस पुरवठ्याची अट शिथिल केलेली आहे. दि.२३ डिसेंबर २०१९ च्या संचालक मंडळाच्या ठरावाने शेअर्स पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. दि. २६ जानेवारी २०२० च्या ठराव क्रमांक ९ ने थकबाकीदार व मयत सभासद वगळून बाकीचे सर्व अंतिम मतदार करण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे प्रारुप मतदार यादीत पाठविलेल्या ९ हजार ५८९ पात्र सभासदांची संख्या बदलून ती ११ हजार ९२५ ने वाढू शकते आणि एकूण पात्र सभासद संख्या २१ हजार ५१४ पर्यंत होऊ शकते.

आता नागवडे सहकारी साखर कारखान्याने दि.२१ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव क्रमांक १२ अन्वये संस्था सभासदांची वार्षिक सभेची उपस्थिती क्षमापित केलेली आहे. त्यामुळे ४३ पैकी अक्रियाशील ठरविलेल्या ३३ सोसायट्यांचे ठराव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यामुळे आता २१ हजार ५१४ व्यक्तिगत सभासद होऊ शकतील आणि सर्वच्या सर्व म्हणजे ४३ सोसायट्या मतदार यादीत येतील.

हीच भूमिका घेऊन कारखान्याने प्रारुप मतदार याद्या प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे पाठविल्या असत्या, तर सुमारे ७०० हरकती घेण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. आणि कारखान्याला विचारांती (मागावून विचार करून) संचालक मंडळाचे चार वेगवेगळे ठराव करण्याची वेळही आली नसती. चुकीच्या प्रारूप याद्या सादर करून नागवडे साखर कारखान्याने अंतिम मतदार याद्यांचा चेंडू विनाकारण प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्या कोर्टात टोलविलेला आहे.

प्रारूप याद्यावरील आमचे आक्षेप आणि कारखान्याने सादर केलेले चार ठराव विचारात घेऊन अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात. अन्यथा आम्हाला औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे, असेही प्रा. दरेकर म्हणाले.

स्रोत:(प्रा.तुकाराम दरेकर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading