#श्रीगोंदा…शेतकरी जगला तर, राज्य जगेल.. शेतकरी मोडला तर, राज्य अडचणीत येईल..!:अजित पवार(उपमुख्यमंत्री)

दिनांक ३० जानेवारी,श्रीगोंदा:

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये एका खासगी दवाखान्याच्या उद्घाटनानिमित्त लोकांना संबोधित करतांना सुरुवातीला आज दिनांक ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने बाप्पूनीं दिलेला अहिंसेचा संदेश व सत्याचा मार्ग सर्वांनीच मार्गक्रमन करणे महात्मा गांधींना अभिवादन होईल. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केले. श्रीगोंदा शहरातील नगरपालिकेच्या माध्यमांतून तयार करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका खासगी दवाखान्याच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात आपले मत व्यक्त केले. कोरोना संकटामुळे संबंध जगाला थांबावे लागले. या संकटामध्ये वैद्यकिय शास्त्रातील डॉक्टर, पॅरामेडिकल फोर्स, नर्सेस, पोलीस या सर्वांनी जिवाचं रान केले. आपल्या कार्यक्षेत्रात, जिल्ह्यात व राज्यात लोकांची सेवा केली, आपला जीव धोक्यात घालून, त्यांनी लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. म्हणून, त्यांनी या सर्वांचं आभार व्यक्त केले. अजित दादांनी अहमदनगर जिल्ह्याला हसन मुश्रीफ यांच्या रुपाने चांगले पालकमंत्री मिळाल्याचे नमूद केले. सामान्यांच्या जनकल्याण योजना याठिकाणी राबवण्यासाठी ते सक्षम आहेत. असे ते म्हणाले. राज्याचा आगामी अर्थसंकल्प अपेक्षित पद्धतीने सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांबाबत बोलतांना त्यांनी सांगितले की, केंद्रात शेतकरी आंदोलन करीत आहेत, अपेक्षीत मागन्यांसाठी त्यांचे आंदोलन चालू असतांना, त्या आंदोलनाला गालबोट लागलं. अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या संदर्भात उपोषणाला बसणार होते. मात्र, राज्य शासनाच्या वतीने त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याने, त्यांचे आंदोलन थांबले आहे. असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी जगला तर, राज्य जगेल. आणि शेतकरी मोडला. तर, राज्य अडचणीतील येईल. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमासाठी (राज्यमंत्री) प्राजक्त तनपुरे, (आमदार) बबनराव पाचपुते, (माजी आमदार) राहुल जगताप, (आयएएस अधिकारी) भाऊसाहेब दांगडे, बाबासाहेब भोस, राजेंद्र दादा नागवडे, घनश्याम आण्णा शेलार, अण्णासाहेब शेलार, केशवभाऊ मगर, जिजाबापू शिंदे, अरुणराव पाचपुते, हरिदास आबा शिर्के, दीपक पाटील भोसले, राजेंद्र गुंड, काकासाहेब तापकीर, (शिवसेनेचे) बाळासाहेब दुतारे, हरी भाऊ काळे, नगरपालिकेच्या (नगराध्यक्ष) शुभांगीताई पोटे, मनोहर दादा पोटे, स्मितल भैया वाबळे, ऋषिकेश गायकवाड, (जिल्हाध्यक्ष) राजेंद्र फाळके, प्रशांत गोरे, सतीश मखरे सह श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस व स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading