दिनांक ३१ जानेवारी, श्रीगोंदा:
लग्न समारंभात पाहुणे व नेतेमंडळी यांच्या स्वागत सत्कारावर होणारा खर्च टाळत, तो विधायक कामासाठी वापरला जावा, ही कल्पना ससाणेनगर, श्रीगोंदा येथील संतोष रंगनाथ ससाणे यांच्या मनात आली. त्यांनी कन्या साक्षी हिचा विवाह ढोरजे येथील बाळासाहेब चांगदेव शिंदे यांचे चिरंजीव धनराज यांचे बरोबर निश्चित केला.

वधू-वर दोघेही शिक्षीत आहेत. मात्र, परिस्थिती बेताची असतानाही लग्न समारंभात त्यांनी सत्काराला फाटा देत, सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ५०५१/- देणगी देऊन समाजासमोर एक मोठा आदर्श घालून दिला आहे. ही देणगी साक्षीचे वडील संतोष ससाणे यांचे हस्ते शाळेचे मुख्याध्यापक संदीप मोटे यांनी स्विकारली.
यावेळी (पो.कॉ.) ह्रदय घोडके, (नगरसेवक) संग्राम घोडके, रावसाहेब घोडके, शिवाजी घोडके, बाळासाहेब महाडीक, (मा.उपनगराध्यक्ष) अशोक खेंडके, संतोष खेतमाळीस, संतोष क्षीरसागर, बापूसाहेब गोरे, नंदकुमार ससाणे, गणेश ससाणे, ढोरजे गावचे सरपंच रावसाहेब वाणी आदींसह दोन्ही परिवारातील पाहुणे मंडळी उपस्थित होते.
स्रोत:(संदीप मोटे,सर)
