कविता लेखन स्पर्धेत सुषमाने मिळाला पहिला नंबर..

दिनांक ३१ जानेवारी(टाकळी कडेवळीत,श्रीगोंदा):

सहायक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर व जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्येमाने ‘मतदार राजा जागा हो‘ कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कु.सुष्मा शिवाजी सोनवणे हिने जिस्तरीय प्रथम क्रमांक मिळविला आहे.तिला सर्व शिक्षक, मुख्याध्पाक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील रहिवाशी शिवाजी सोनवणे हे तालुक्यातील चोराचीवाडी येथील शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कन्या सुषमा शिवाजी सोनवणे हिने ‘मतदार राजा जागा हो‘ याबाबत सहाय्यक समाज कल्याण आयुक्त व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कविता लेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यात पहिला पहिला नंबर मिळवला असून, तिचा सत्कार समाज कल्याण आयुक्त व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या मार्फत अहमदनगर या ठिकाणी नुकताच पार पडला.

या स्पर्धेत पहिला नंबर मिळाल्यामुळे श्रीगोंदा परिसरातून तिच्यावर शुभेच्छा वर्षा होतांना दिसत आहे. तसेच, सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

स्रोत:(पत्रकार दादासाहेब सोनवणे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading