#श्रीगोंदा..विमुक्त भटक्या समाजावर Actrocity नुसार गुन्हा दाखल होणे योग्य आहे का ?

श्रीगोंदा तालुक्यातील एका घटनेच्या अनुषंगाने..

ब्रिटीशांनी चोर, गुन्हेगार ठरवले, ते कमी झाले की काय ? म्हणून, आता Actrocity सारख्या जात प्रतिबंध कायद्याखाली या समुदायातील वडार सारख्या विमुक्त भटक्या लोकांनवर गुन्हे दाखल होत असताना सरकार मुग गिळून या गंभीर बाबीकडे डोळे झाक करत आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

मु.पो.लिपंनगाव ता.श्रीगोंदा जि.अहदनगर येथे गायरानात गावाच्या बाजुला वस्तीला असणाऱ्या वडारवस्ती मधील कुटुंबावर गुन्हा दाखल झालेला आहे. याच ठीकाणी भटक्या विमुक्तांची घरे जाळून टाकल्याच्या घटनेचे निखारे अजुन विझलेले नसताना, आता याच लोकांवर Actrocity कायद्याचे हत्यार उपसले गेलेले आहे. याचा मी तीव्र निषेध करतो. हे दाखल झालेले गुन्हे सरकारने त्वरित मागे न घेतल्यास.., विमुक्त भटक्या समुदायाच्या वतीने आंदोलनाचे स्वरुप तीव्र केले जाईल. यामुळे सामाजिक सलोखा बिघडेल म्हणुन, आमच्यावर आणखी गुन्हे दाखल झालेले तरी बेहतर. परंतु, हा आमच्या लोकांनवर होत असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. सामाजिक सलोखा अबाधीत ठेवण्याचा ठेका आम्ही घेतलेला नाही.

या सरकारला आमचे ठणकावून सांगणे आहे की. एकीकडे आम्ही भटक्या विमुक्तांना नमूद कायद्याअंतर्गत संरक्षण मिळायची आम्ही कीतैक वर्षांपासुन मागणी करत असताना. याच कायद्याच्या आधारे भटक्या विमुक्तांवर गुन्हे दाखल होत असतील. तर, भटके विमुक्त नेमके कोण आहेत.?

ह्या सरकारचे ठोके ठिकाणावर आहे काय? भटके विमुक्त म्हणजे जनावर आहेत की काय ?
कोठे SC ? कोठे ST ? कोठे VJNT ? कोठे MBC ? कोठे BC ? कोठे तर General हे काय चालु आहे. आम्ही नेमके कोण आहोत ? आम्ही या देशाचे नागरी आहेत की नाही ? का EVM मशिन सारखी मत देणारी यंत्र माणस आहोत ?

ज्या देशामधे आम्हांला गावात प्रवेशाला बंदी घातली जाते. तो आमचा देश कसा ? जिथे राहातो तिथुन हाकलले जाते ? ना हक्काचे घर… ना गाव… नसणाऱ्या लोकांवर या देशात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार (अँट्रासीटी) दाखल होते. वा.. सरकार वा.. आणि सरकार चालवणाऱ्या पुढाऱ्यांनो वा.. तुमची पाठ खंरच थोपाटलीच पाहिजे.

देशाला स्वातंत्र्य मिळण्या आगोदरपासुन या स्थलांतरित जिवन जगणाऱ्या लोकांची हेळसांड चालु आहे. असणाऱ्या सर्वच सरकारमधल्या पुढाऱ्यांनी या समुदयाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. याचेच हे परिणाम या समुदयातील लोक अजुनही भोगत आहेत. हे या आजच्या अँट्रासिटी कायद्याच्या वापरावरुन दिसत आहे. करा.. करा.. एक दिवस नक्की येईल. त्या दिवशी देशातले हे उशिरा मुक्त केलेले लोक या सर्व गोष्टीचा समाचार घेतल्याशिवाय राहाणार नाहीत. भटक्या विमुक्तां बाबत सहानुभुती दाखवणाऱ्या दुतोंडी राज्यकर्ते, समाजसेवक, विचारवंत यांचे बुरखे फाडण्याचीही आता वेळ आलेली आहे. लक्षवेधी आंदोलन अटळ आहे.

भरत विटकर,विशेष मुक्त लोकाधिकार मंच..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading