महावितरण विरोधात”हल्लाबोल व ठिय्या”आंदोलन..

दिनांक ३ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

महावितरणने महाराष्ट्रातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांना विजतोडीची नोटीस व तोंडी माहिती देण्यात आलेली असून, विजतोडीचे काम महावितरणने चालू केले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

वास्तवामध्ये महावितरण कडून अनेकांना अव्वाच्या-सव्वा बिले कोरोना काळामध्ये आलेली आहेत.अनेकांची बिले तर लाखोंच्या घरात आलेली आहेत. तसेच, तालुक्यात घोड,विसापूर व कुकडीचे आवर्तन चालू आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हा सावळा गोंधळ असताना ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या बोगस कारभारा निषेधार्थ शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता श्रीगोंदा येथे भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयावर “हल्लाबोल व ठिय्या” आंदोलन करण्यात येणार आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांचे व व्यवसायिकांचे एक कनेक्शन जरी तोडले गेले. तर, भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल. असे निवेदन उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी श्रीगोंदा, यांना भाजपा श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, संतोष खेतमाळीस, राजेंद्र उकांडे, अंबादास औटी, संजयकुमार शेळके, उमेश बोरुडे, महेश क्षिरसागर, योगेश सावंत, संदिप कोकाटे यांनी समस्त जनतेच्या वतीने दिले.

स्रोत:(संदीप नागवडे यांनी प्रसिध्दीस दिलेले पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading