श्रीगोंदा… म.फुले व डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त महामानवांना अभिवादन…

दिनांक १४ एप्रिल, श्रीगोंदा:

शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सिद्धार्थनगर व ससाणे नगर येथील काही समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये सदरील कार्यक्रम पार पडला.

यावेळी तालुक्याचे तहसीलदार प्रदीप पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, नगरसेवक व ठराविक नागरिक उपस्थित होते.  कोरोना महामारीचे निकष पाळत सदर कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. यावेळी प्रदीप पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देत कोरोना महामारी संदर्भात जनजागृती म्हणून सूचना दिल्या.

यानंतर सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषद शाळा कार्यालयात तहसीलदार, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमेचे पूजन करून आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सिद्धार्थनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसरात सामाजिक अंतर ठेवून महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी तालुक्याचे आमदार बबनराव दादा पाचपुते, जि प शाळेचे मुख्याध्यापक संदीप मोटे, नगरपालिकेचे नगरसेवक संग्राम घोडके, हृदय (दादा) घोडके, निसार बेपारी, तालुका आरोग्य विभागाचे पंडित साहेब, जिवाजी घोडके (आरपीआय तालुका अध्यक्ष), अविनाश घोडके, अवि घोडके, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके, आरपीआयचे शहराध्यक्ष विशाल घोडके, गणेश मनोहर घोडके, गणेश घोडके, गटशिक्षण अधिकारी बोरुडे सर, शिक्षिका सौ. शेळके मॅडम, सुरज घोडके, किशोर नेटके, नंदू (भाऊ) ससाने, शिवाजी (आप्पा) घोडके, सचिन झगडे सर, सुनील घोडके, सुनील काशिनाथ घोडके, विशाल घोडके, पो. कॉ. झुंजार बाप्पू, पो. कॉ. संतोष कोपनर, पो. कॉ. संतोष भापकर, पोलीस उपनिरीक्षक गट साहेब, लक्ष्मण काशिनाथ घोडके, दीपक घोडके, हरिचंद घोडके, पत्रकार राजेंद्र राऊत इत्यादी मान्यवर सुरक्षित ठिकाणी उपस्थित होते. सामाजिक अंतर ठेवत कार्यक्रम संपन्न झाला.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Rpi

https://bit.ly/bspmycityshrigonda

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading