श्रीगोंदा नगरपालिका उभारणार १०० खाटांचे सुसज्य रुग्णालय..

दिनांक ११ जून, श्रीगोंदा:

श्रीगोंदा नगरपालिकेने कोरोना संक्रमणातून निर्माण झालेल्या आपत्तीत स्थानिक प्रशासनाबरोबरीने नगरपालिका प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपालिका) या संकट काळात नियोजनबद्ध शहर वाशीयांसाठी धडपड करत होती. मात्र, तुटपुंजी संसाधन आड येत असल्याने, काही प्रमाणात मर्यादा येत होत्या. परंतु, आत्ता नव्याने पुढे येणाऱ्या आरोग्य प्रश्नांबाबत तयारीसाठी तसेच, कोरोणाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेमार्फत शहरात १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व गटनेते मनोहर(दादा) पोटे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

पोटे यांनी सांगितले कि, अडीच वर्षापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात देखील रुग्णालय उभारणीचे वचन दिले होते. त्यासाठी लागलीच पाठपुरावा देखील सुरू केला होता. तथापि आचारसंहिता, लॉकडाऊन यात खूप कालावधी गेला. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत श्रीगोंदा शहरातील नागरिकांची उपचारासाठी मोठी धावपळ झाली. वेळेत उपचार मिळाले नाही. हे पाहता नगरपालिकेने शहरात सुसज्ज रुग्णालय उभारणीचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने लागलीच कार्यवाही करून महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करीत, कमी कालावधीत मंजुरी व तत्सम कामे मार्गी लावून रुग्णालय उभारले जाईल. असा विश्वास, गटनेते पोटे यांनी व्यक्त केला.

पोटे म्हणाले की, लॉकडाऊन काळात आपल्या सहकारी नगरसेवकांनी आरोग्य विभागामार्फत जागरूकतेने काम केले. तसेच, विविध विकास कामे सुरू असून, पाणी पुरवठा व विजेबाबत जागरूक आहेत. शहर विकासाला आपले प्राधान्य होते. यापुढेही राहील हे आपण कृतीतून सिद्ध केलेच, त्याचबरोबर रुग्णालय उभारणी देखील करून शहर वासीयांना उपचार मिळवून देऊ. असे आश्वासन श्रीगोंदा शहर वासीयांना मनोहर दादा पोटे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धि पत्रातून दिले आहे. shrigonda-municipality-to-set-up-a-well-equipped-100-bed-hospital

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading