श्रीगोंदा खून प्रकरण: पीडित कुटुंबाला ५ लाखांची मदत; एका सदस्याला शासकीय नोकरीचे आश्वासन..

श्रीगोंदा | ७ मार्च २०२६:

श्रीगोंदा येथे घडलेल्या रजपूत हत्याकांडातील पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अहमदनगर येथील समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची नुकतीच भेट घेतली.

या भेटीदरम्यान, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी पीडित कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

या प्रकरणी शासनाकडून पीडित कुटुंबाला तातडीची मदत म्हणून एकूण ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये मयत भाऊसाहेब नामदेव रजपूत यांच्या पत्नी यांना ४ लाख १२ हजार ५०० रुपये तर मयत भाऊसाहेब नामदेव रजपूत यांच्या मुलास ५० हजार रुपये तरतूद करण्यात आली.

उर्वरित निधी कायदेशीर प्रक्रियेनुसार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

https://amzn.to/3OXPxHy

केवळ आर्थिक मदतच नाही, तर पीडित कुटुंबातील एका सदस्याला त्यांच्या पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासनही सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी दिले आहे.

पीडित कुटुंबाच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याने, यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, कुटुंबाला योग्य संरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा करण्याचे मान्य केले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply