वंचित बहुजन आघाडीची श्रीगोंदा तालुका आढावा बैठक संपन्न..

दिनांक ५ ऑक्टोबर,श्रीगोंदा,:

तालुका शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक ४ ऑक्टोबर रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते कालकथित जालिंदर तात्या घोडके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कांतीलाल कोकाटे, संतोष जौंजाळ, आबासाहेब रामफले, महेंद्र थोरात, अशोक मोरे, प्रमोद काळे, पारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, निलेश गायकवाड, विनोद गायकवाड (खंडाळा), टिळक भोस (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, अहमदनगर), खादी ग्रामोद्योगचे संचालक धनंजय लोखंडे, पै. जग्गूदादा गायकवाड, योगेश साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

यावेळी कांतीलाल कोकाटे यांनी लोकसभा/विधानसभा निवडणुका तसेच, श्रीगोंदा तालुक्याचा आढावा सांगत, नवीन रूपरेषा कशी असावी? तालुक्याच प्रतिनिधित्व तरुण पिढीकडे देण्यात यावे. असे प्रतिपादन केले. संतोष जौंजाळ यांनी सर्व जुन्या नवीन कार्यकर्त्याचां परिचय करून देत, गेल्या तीन वर्षापासून काम करीत असताना प्रमुख्याने येणाऱ्या अडचणीवर कशी मात केली, यावर चर्चा केली.

प्रमोद काळे यांनी श्रीगोंदा तालुक्यात दलित/आदिवासीवर, भटक्या समाजावर राजरोस पणे स्थानिक पातळीवर व प्रशासन कसे अन्याय अत्याचार करतात? सांगत त्यांना वंचितांचे नेते म्हणून न्याय मिळवून देण्याची विनंती केली. निलेश भाऊ गायकवाड यांनी नूतन जिल्हाध्यक्ष यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, त्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी गरीब मराठा/श्रीमंत मराठा यांच्यातील फरक सांगत आद.प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण बाबत मांडलेली भूमिका कशी योग्य आहे. याचे स्पष्टीकरण दिले. तसेच, समाजातील विविध घटकातील वंचित समूहाला जास्तीत जास्त जोडण्याचे काम कसे करावेत? संघटन मजबूत व वाढण्यासाठी कसे काम करता येईल? यावर मार्गदर्शन केले.

यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रतीक बारसे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, श्रीगोंदा तालुक्यातील विविध संघटनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या. पारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांनी आभार मानले.

स्रोत:(योगेश साठे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading