पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचे दलित महासंघाच्या वतीने स्वागत..

दिनांक ५ ऑक्टोबर,अहमदनगर:

अहमदनगर जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटिल यांचे दलित महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. त्यांची कार्यकर्त्यांनी अधीक्षक कार्यालयात भेट घेऊन, संघटनेच्या कार्याची माहिती देत, जिल्ह्यात स्वागत केले आहे. तसेच, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी दलित महासंघाचे (प्रदेशाध्यक्ष) काशिनाथ सुलाखे पाटिल, (जिल्हाध्यक्ष) संजय चांदणे, (जिल्हा उपाध्यक्ष) सलिम सय्यद, (जिल्हा संपर्कप्रमुख) कडुबाबा लोंढे, (श्रीगोंदा तालुकाध्यक्ष) चंद्रकांत सकट, (उपाध्यक्ष) प्रमोद शेंडगे, (नगर तालुकाध्यक्ष) रफीक शेख, (प्रसिद्धि प्रमुख) प्रकाश काळोखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(संजय चांदणे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading