श्रीगोंदा… तालुक्यातील जनता कोरोना पॉजिटिव्ह होत असतांना, तालुक्याचे भाग्यविधाते, कार्यसम्राट, काळीज, ज्येष्ठ नेते, युवा नेते, सरकार समर्थक, विरोधक हा प्रादुर्भाव रोखण्यात मात्र निगेटिव्ह.!!

दिनांक १७ एप्रिल,श्रीगोंदा:

कोरोनाची दुसरी लाट श्रीगोंदा शहर आणि तालुक्यातील अनेक गावात अक्षरशः थैमान घालत असताना तालुक्यातील नेतेमंडळी मात्र आपण या गावचे नाही अशी भूमिका घेत आहेत. ही दुर्दैव असल्याची खंत नगरसभा आंदोलनाचे अध्यक्ष राजेश डांगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

डांगे म्हणाले दुसऱ्या लाटेत सुमारे दोनशे रुग्ण शहर, दौंड, नगर, पुणे, बारामती येथे उपचारासाठी जात आहेत. त्यांचा संभ्रम वाढत असतांना राजकारणी मदत करत नाहीत. केवळ तालुक्यातील रहिवाशी असल्याने आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर २४ तास झटत आहेत, धावपळ करत आहेत, शहरातील खाजगी डॉक्टर आपल्या परीने उपचार करत आहेत. पण रुग्णांना दिलासा, मोठया रुग्णालयात किंवा नगर सिव्हिल मध्ये दाखल करण्याकामी तसेच मोठे कोविड सेंटर उभारणीसाठी राजकारणी उदासीन आहेत.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सध्या रेमडिसिव्हीर इंजेक्शन तुटवड्याचा मोठा फटका आपल्या तालुक्याला बसला. पण याचे कोणालाच सोयरसुतक नाही. असे सांगून डांगे यांनी सध्या छातीच्या सिटी स्कॅनसाठी प्रतीक्षा यादी आहे. कोरोना चाचणी अहवाल नगरहून येण्यास वेळ लागतो. त्यामुळे रुग्णही अत्यवस्थ होत आहेत. सिटी स्कॅन श्रीगोंदयात हवे, शिवाय येथील ग्रामीण रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा व्हायला हवा. प्रशासकीय अधिकारी, राजकारण्यांच्या मदत शिवाय याची पूर्तता करू शकत नाहीत. याचे भान तालुक्याचे भाग्यविधाते, कार्यसम्राट, काळीज, ज्येष्ठ नेते, युवा नेते, मंत्र्या बरोबर फोटो सेशन करणारे, सरकारचे समर्थन करणारे, सरकार विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांनी ठेवावे. अशी मागणी करून डांगे यांनी सामाजिक, राजकीय मंडळींनी एकत्र येत आपल्या लोकांना सुविधा देण्यात याव्यात. तरच लोक वाचतील असे म्हंटले आहे.

श्रीगोंदयात कंट्रोल रूम करून तेथून तपासणी, इंजेक्शन, बेड, ऑक्सिजन, समुपदेशन करण्यात यावे यासाठी आपण पुढाकार घेणार असून समविचारी लोकांची लवकरच बैठक घेणार आहोत.असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading