दिनांक १५ मार्च श्रीगोंदा:
सगळीकडे वाढत चाललेल्या प्रादुर्भावास लक्षात घेत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्या संदर्भात सूचना केल्या आहेत.त्या अनुषंगाने उद्या दिनांक १६ मार्च रोजी होत असलेला आठवडे बाजार रद्द करण्यासंदर्भात श्रीगोंद्याचे तहसीलदार यांनी श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनास सूचना दिल्या आहेत.त्या नुसार उद्या भरणारा आठवडे बाजार बंद असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून, स्थानिक प्रशासनाने उद्याचा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांचेकडून श्रीगोंदा नगरपालिकेला बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे तहसीलदार माळी यांनी माध्यमांना सांगितले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून,बाजार बंद राहणार आहे.असेही त्यांनी सांगितले आहे.
याविषयी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. शुभांगीताई मनोहर पोटे यांनीही तहसीलदार यांनी दिलेल्या सूचनांची लगेचच अंमलबजावणी करीत, शहरांमध्ये स्पीकर द्वारे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.उद्या आठवडे बाजारासाठी शेतकऱ्यांनी भाज्या,फळे व विक्रीसाठी लागणाऱ्या शेतीतील वस्तूंची तोडणी करू नये.जेणेकरून उद्याच्या बाजार बंद मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होनार नाही.असेही आवाहन केले आहे. त्याचबरोबर नगरपालिकेने केलेल्या आव्हानाला सर्वांनी सहकार्य करीत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, स्वतःची काळजी घ्यावी व खबरदारी ची उपाययोजना म्हणून,उद्याचा आठवडे बाजार बंद करावा.असेही सुचवण्यात आले आहे.
