राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत (NTS) श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे घवघवीत यश..

दिनांक २४ जून, श्रीगोंदा :


तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलातील “श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालया“च्या २८ विद्यार्थिनी एन. टी. एस. परीक्षा पात्र झाल्या व १ विद्यार्थिनीची स्टेज २ परीक्षेसाठी निवड झाली.

त्यात सृष्टी जगताप, प्रगती होले, प्रणाली लहाकर, आसावरी हिरवे, आसावरी शिंदे, स्नेहा बोरुडे, वैष्णवी अधोरे, वैष्णवी बोथेकर, वैष्णवी चव्हाण, साक्षी दांगडे, कल्याणी इगावे, सोनाली होले, संज्योत नागवडे, तनुजा नलगे, कीर्ती अनुसे, अमृता कांबळे, अक्षदा मते, अक्षदा वाघमारे, ऋतुजा चव्हाण, ऋतुजा दुतारे, फौजिया सय्यद, पौर्णिमा औटी, अनुष्का सोमवंशी, अनुष्का तरटे, सृष्टी धोत्रे, सृष्टी होले, सायली ढवळे, आर्यंका शेळके यांनी यश मिळवले.

त्यातील सृष्टी दादा जगताप हिने १४८ गुण मिळवून रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच तिची स्टेज २ परीक्षेसाठी निवड झाली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या विद्यार्थिनींना विभागप्रमुख नितीन खेतमाळीस, विकास चव्हाण, तसेच दहावीच्या इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. Shrimant Rajmata Vijayaraje Shinde Kanya Vidyalaya’s resounding success in National Intelligence Examination (NTS).

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, माध्यमिक सहसचिव संजय नागपुरे, जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर, विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना नगरे, उपमुख्याध्यापिका गीता चौधरी, पर्यवेक्षक दिलीप भुजबळ, गुरुकुल प्रमुख राजेंद्र खेडकर, शिक्षक नेते वसंत दरेकर यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading