वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन काळाची गरज: (मा. नगराध्यक्ष व गटनेते) मनोहरदादा पोटे..

दिनांक २४ जून,श्रीगोंदा:

वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. सरकार, सामाजिक संस्था वृक्षारोपणाचा आग्रह धरत राहिले. पण, लोकांनी दुर्लक्ष केले. त्याची मोठी किंमत आपण मोजली. कोरोना महामारीत सर्वांनाच ऑक्सिजनची किंमत कळाली. वृक्ष प्राणवायू निर्मितीचे केंद्र असल्याने, वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धनासाठी नागरिकांनी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मा. नगराध्यक्ष व गटनेते मनोहर पोटे यांनी “माझी वसुंधरा अंतर्गत वृक्षारोपण” प्रसंगी बोलताना केले.

शासनाच्या प्रति व्यक्ती एक वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ येथील प्रभाग चार मधील खुल्या जागेत वड, चाफ्याचे वृक्षारोपणाने करण्यात आला. यावेळी पोटे बोलत होते. Tree Planting and Tree Conservation Need of the Hour: (Hon. Mayor and Group Leader) Manohardada Pote ..

पोटे म्हणाले की, वटसवित्री पौर्णिमा औचित्य साधून, वृक्षारोपण करण्यात आले. यापुढे सर्व नागरिकांना वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्यासाठी अभियान राबवले जाईल. हे केवळ शासकीय औपचारिक अभियान न राहता, आरोग्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे. असे आवाहन पोटे यांनी केले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी (नगराध्यक्षा) सौ. शुभांगीताई पोटे, (उपनगराध्यक्ष) रमेश लाढाणे, (मुख्याधिकारी) मंगेश देवरे, (गटनेते) मनोहरदादा पोटे, सतिश मखरे, अशोक खेंडके, बापू गोरे, शहाजी खेतमाळीस, सौ. सीमा गोरे, निसार बेपारी, संतोष क्षीरसागर, प्रशांत गोरे, गणेश भोस, अंबादास औटी सह कर्मचारी उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading