श्रीगोंदा तालुक्यातील ओबीसी, भटके विमुक्त, बहुजनांची महा एल्गार सभेला लक्षणीय उपस्थिती.. शेकडो वाहनांसह हजारों समाज बांधव आरक्षण बचाव मेळाव्यात सहभागी..!

दिनांक ३ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

आज नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी/भटके विमुक्त महाएल्गार मेळाव्यासाठी स्थानिक obc, भटके विमुक्त आणि बहुजन बांधवांच्या माध्यमांतून तालुक्यातील प्रत्येक गावात जातं मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. सभेसाठी सर्व बहुजन समाज बांधवांचा सकारात्मक प्रतिसाद पाहण्यास मिळाला. शेडगाव येथून निघालेल्या संवाद्य मिवणुकीदरम्यान हजारोंच्या संख्येने लोकं सहभागी झाले. तालुक्यातील टाकळी – आढळगाव – श्रीगोंदा शहरामार्गे ही मिरवणूक पारगाव – घारगाव – कोळगाव येथील समाज प्रतिनिधींना सोबत घेत शेकडो गाड्यांचा ताफा हजारो जनसमुदाय महापुरुषांच्या घोषणा देतं पुढे नगर स्थित सभेकडे रवाना झाला.

सकाळी आढळगाव येथे मोठ्या संख्येने ओबीसी, भटके विमुक्त, बहुजन, दलीत आदिवासी समुदयातील लोकांनी हजेरी लावली. याठिकाणी खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन शरद जमदाडे, सरपंच शिवप्रसाद उबाळे, ओंकार शिंदे या सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने व नियोजनात शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलक मेळाव्यासाठी रवाना झाले. यावेळी आढळगाव परिसर “एकच पर्व बहुजन सर्व” च्या घोषणांनी दुमदुमला.

या प्रसंगी शरद जमदाडे, ओंकार शिंदे, (सरपंच) शिवप्रसाद उबाळे, जिजाराम डोके, सागर वाकडे, प्रशांत जमदाडे, माऊली उबाळे, बाळासाहेब शिंदे, राहुल राऊत, जालिंदर बोडखे, नवनाथ वाकडे, मनोज डोके, दीपक होले, श्रीकांत ठवाळ, कांताराम डोके, अमोल डाळिंबे, दीपक राऊत, उत्तम राऊत, विजय वाकडे, बंडू वाकडे, गणेश शिंदे, सतीश काळे, आबा शिंदे, झुंबर राऊत, विलास शिंदे, बापू शिंदे, हनुमंत डोके आणि सर्व बहुजन वर्गातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे तालुक्यातील बेलवंडी, काष्टी, पिंपळगाव पिसा, भानगाव, निमगाव खलु, दौंड, म्हसे, या मोठया गावांच्या आसपासच्या परिसरातील ग्रामस्थ वेगवेगळ्या ठिकाणी नमूद रॅलीत सहभागी झाले. हा बहुसंख्य जन समुदाय नगर येथील आंदोलन ठिकाणी एल्गार सभेत ना. छगन भुजबळ साहेब व उपस्थित मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी हजर होते. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सावता परीषद, माळी समाज बांधव, ओबीसी समाज प्रतिनिधी, बहुजन व भटके विमुक्त बांधव आणि मा.छगन भुजबळ समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(पत्रकार सचिन शिंदे),
छायाचित्रं:(पत्रकार जावेद इनामदार)

महिलांची संख्या लक्षणीय होती.
मोठया संख्येने उपस्थित जन समुदाय..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading