डोंगराच्या कुशीत वसलेली. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी उपक्रमशील अन सौर उर्जेवर चालनारी तालुक्यातील एकमेव शाळा म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील उख्खलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळके मळा होय. १९५९ साली स्थापन झालेली ही शाळा आज मोठ्या दिमाखात विद्यार्थ्यांचा सांभाळ करत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळके मळा शाळेची स्थापना १९५९ सालची. आज शाळेची आकर्षक असलेली शाळेची इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वच्छ व सुंदर परिसरामुळे व नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे शाळेचा विकास झाला आहे.
लोकांच्या सहभागामुळे शाळेला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शाळेला आयएसओ २००९ -२०१५ हे मानांकन मिळाले आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शाळा १०० टक्के प्रगत झाली आहे. शाळा सिध्दी मुल्यांकनात शाळेला नेहमीच अ दर्जा प्राप्त झाला आहे. शाळेला ब्रॉण्डबॅण्ड व वायफायची सुविधाही आहे. याशिवाय डिजिटल स्कूल म्हणून शाळा नावलौकीकास आली आहे.
लोकसहभागातून भव्य क्रीडागण उभारण्यात आलं आहे. रंगरंगोटीमुळे शाळेच्या भिंती बोलू लागल्या. आकर्षक सुविधांनी युक्त अशी शाळा असल्याने शाळेत विद्यार्थ्यांचे शिक्षण घेताना मन रमते. गुणवत्तेच्या बाबतीत शाळा नेहमीच अग्रेसर राहिली. माजी मुख्याध्यापक गांगड, राजू लाकूडझोडे यांचे मोलाचे योगदान लाभले. २०११ साली शाळेवर नव्याने रुजू झालेले अनिल हंडोरे यांचे भरीव योगदान शाळेला लाभले. हंडोरे व सहशिक्षका विकासासाठी त्यांनी स्वतला झोकून दिले. वैशाली येणारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतला झोकून दिले, इंग्रजी शाळेचे वारे वाहत असतानाही स्वतची मुले त्यांनी वाळकेमळा शाळेत टाकली. यामुळे शाळेची पटसंख्या ५० च्या जवळ गेली.
यापूर्वी घेण्यात आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्यातून शाळेसाठी निधी गोळा झाला होता. या निधीमधून शाळेला क्रीडांगण उभारण्यात आले. माजी विद्यार्थी मेळावा, ग्रामस्थांचा मेळावा शाळेतच पार पडतो. यामधून विद्यार्थ्यांचा अडीअडचणी सोडून त्यावर मार्गही शाळेतच निघतात.
शाळेची इमारत जुनी होती. यावेळी उख्खलगावचे माजी सरपंच सुभाष वाळके व जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी वाळकेमळा शाळेसाठी नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या. शाळा व्यवस्थापन समिती माध्यमातून आकर्षक इमारतीचे बांधकाम झाले. अनेक शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक बाबींचा अभ्यास केला जातो. विद्यार्थ्ययांच्या बौध्दीक विकासासाठी प्रश्नमंजुषा, स्पर्धापरीक्षांचे आयोजन केले जाते. सामान्य ज्ञानावर आधारित परीक्षाही वेळोवेळी घेतल्या जातात. बौध्दिक विकासाबरोबरच शारीरिक विकासही महत्वाचा आहे. त्यासाठी खेळांच्या स्पर्धांचेही आयोजन केले जाते. लोकसहभागातून वाळकेमळा शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली.
शाळेचे माजी शिक्षक व विद्यमान सहायक संचालक लेखा व वित्त अधिक्षक राजू लाकूडझोडे यांनी मुलांना शुध्द पाण्याची सोय करून दिली.
या कामी ग्रामस्थांनी मोठी मदत केली. त्यामुळे आज ही शाळा उभी राहिली.
शाळा व्यवस्थापन समितीचे आजी माजी अध्यक्ष सर्व सदस्य, माजी सरपंच सुभाष वाळके, विद्यमान सरपंच अनिल ढवळे, प्रा. संजय लाकूडझोडे, सभापती पुरुषोत्तम लगड यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभले. केंद्रप्रमुख सुरेश खोडके, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कलंगुडे, निळकंठ बोरुडे, अनिल शिंदे, गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहकारी शिक्षिका वैशाली येणारे याही परिश्रम घेतात.
शब्दांकन : उत्तम राऊत, प्रतिनिधी, केसरी..
स्वच्छ व सुंदर शाळेबरोबरच दजेर्दार शिक्षण देणारी शाळा असा नावलौकीक टिकवून ठेवायचा आहे . मुलांनी आनंददायी व प्रसन्न वातावरण दिले जाणारे शिक्षण महत्वाचे आहे. शाळेच्या विकासासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. राजाराम घोडके, मुख्याध्यापक.
(प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित झालेल्या वेळेची आहे.)
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)..
