दि. ४ मार्च २०२०,श्रीगोंदा:
वाढत्या मागणीवरून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ‘श्रीगोंदा आगाराच्या’ वतीने दिनांक ११ मार्च २०२० रोजी ” अष्टविनायक दर्शन ” यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्वांनी अष्ट विनायक दर्शन यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीगोंदा बस आगारातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रातून केले आहे.
सदर बसचा पहिल्या दिवशी श्रीगोंदा -सिद्धटेक -मोरगाव -थेऊर -ओझर मुक्काम.तर,दुसऱ्या दिवशी:लेण्याद्री -महाड -पाली -रांजणगाव -श्रीगोंदा असा प्रवास राहील यात्रेकरिता तिकीट दर पुढीलप्रमाणे :
९०५ रुपये फुल व जेष्ठनागरिकांना ४६० रुपये इतका
आहे.यात्रेच्या अधिक माहितीकरिता संपर्क करण्यासाठी श्री.अमोल मोटे 9270847735,श्री दत्तात्रय काळे 9860754587,श्री संतोष नवले 9922227068 यांच्याकडे संपर्क करावे,असे सांगण्यात आले आहे.
सदर यात्रेचे तिकीट बुकिंग श्रीगोंदा बसस्थानकावर उपलब्ध आहे. तरी श्रीगोंदा तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या अष्टविनायक दर्शन यात्रा सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहन आगार व्यवस्थापक श्री प्रविण शिंदे व वाहतूक निरीक्षक रोहित रोकडे यांनी केले आहे .
