नगर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार तूर व हरभरा खरेदी केंद्र सुरु
01 mins
दिनांक ४ मार्च,अहमदनगर:
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार सन 2019-20 या वर्षासाठी जिल्हयात नाफेड करीता मार्केटींग फेडरेशनच्या सभासद संस्थामार्फत तूर खरेदी व हरभरा नोंदणी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. शासनाने तूर खरेदीसाठी 5 हजार 800 रुपये प्रति क्विंटल दर प्रमाणे दि. 15 मार्च 2020 पर्यत व हरभरा खरेदीसाठी 4 हजार 875 रुपये प्रति क्विंटल दर प्रमाणे दि.25 फेब्रुवारी 2020 पासून नाव नोंदणीचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.
जिल्हयामध्ये सुरु करण्यात आलेले खरेदी केंद्र – राहुरी – राहुरी तालुका खरेदी विक्री संघ लि,राहुरी, (मोबाईल नंबर 9665722815), शेवगाव – जगदंबा महिला ग्राहक सह.संस्था, शेवगाव (मो.नंबर 9604168168), खर्डा – शिवरत्न मल्टी पर्पज को ऑप सो. मर्या, जामखेड (मो.नंबर 9423167596), कर्जत- कर्जतकर फार्मर प्रोडूसर कंपनी (मो.नंबर 9503031010), पाथर्डी- जय भगवान स्वयंरोजगार सह.संस्था, पाथर्डी (मो.नंबर 9423164754), नगर- कृषी उत्पन्न बाजार समिती नगर (मोबाईल नंबर 9881879985), पारनेर – कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर (मोबाइल नंबर 8380001614), श्रीगोंदा- श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघ लि. श्रीगोंदा(मो.नंबर 9011957878) व नेवासा – (मो.नंबर 7219115458) अशी आहेत.