श्रीगोंद्यात Covid-19 साठी विशेष मनुष्यबळ कंत्राटी पदभरती.

दिनांक १९ एप्रिल, श्रीगोंदा:

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यासाठी covid-19 या साथ रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने श्रीगोंदा तालुक्यातील covid-19 अंतर्गत डीसीएचसी/सीसीसी रुग्णालयांकरता कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्त्वावर आवश्यक मनुष्यबळाकरिता मेडिकल ऑफिसर आयुष्य, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्नीशियन, स्वीपर, वार्ड बॉय आणि डाटा एन्ट्री या पदांसाठी भरती होणार आहे. श्रीगोंदा तालुका आरोग्य विभागामार्फत ही भरती घेण्यात येणार असून, दिनांक २० एप्रिल रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे पात्र उमेदवारांनी अर्जा सह उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे. त्यासाठी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत या कालावधीत उपस्थित उमेदवाराचे आवश्यक शैक्षणिक अहर्ता असलेले शेवटच्या वर्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर मेरिट लिस्ट तयार करण्यात येऊन त्याच दिवशी नियुक्‍त्या देण्यात येणार आहेत. (Special Manpower Contract Recruitment for Covid-19 in Shrigonda.)

या भरतीमध्ये मेडिकल ऑफिसर आयुष या पदासाठी शैक्षणिक पात्रता बीएएमएस किंवा एमबीबीएस असणार असून, त्यासाठी ३० हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या साठी १० जागा आहेत. स्टाफ नर्स या पदासाठी ८ जागा असून, शैक्षणिक पात्रता बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम/ एएनएम असणार आहे. या पदासाठी २० हजार रुपये प्रतिमाह वेतन आहे. फार्मासिस्ट या पदासाठी २ जागा असून, डी.फार्म किंवा बी.फार्म अशा शैक्षणिक पात्रतेचे सह २ पदांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी १७ हजार रुपये वेतन मिळणार आहे. लॅब टेक्निशियन पदासाठी बीएस.सी.डीएमएलटी ही शैक्षणिक पात्रता असून, १७ हजार रुपये वेतन या पदासाठी वेतन मिळणार आहे. यासाठी ३ जागा आहेत. स्वीपर साठी शैक्षणिक पात्रतेची अट नमूद नसून, प्रति महिना १० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. यासाठी २ जागा आहेत. वार्ड बॉय साठी दहावीची शैक्षणिक पात्रता असून, ४ जागांसाठी प्रत्येकी चारशे रुपये रोज प्रमाणे पगार देण्यात येणार आहे. डाटा एंट्री ऑपरेटर साठी कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच टायपिंग मराठीमध्ये ३० व इंग्लिश मध्ये ४० डब्ल्यूपीएम टायपिंग स्पीड आवश्यक आहे. यास १७ हजार रुपये मानधन मिळणार असून, चार पदांसाठी ही भरती होणार आहे. उमेदवारांनी उद्या दिनांक २० एप्रिल रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयात सकाळी १० ते १२ या वेळेत उपस्थित राहावे.

स्त्रोत:(आरोग्य अधिकारी पंचायत समिती, श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading