दिनांक ५ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
शहरातील ससाणे नगर आणि कोथंबिरे मळा (पटेल वस्ती) परिसरात २ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन गटांमध्ये किरकोळ वाद आणि त्यातून दगडफेक झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर काही समाजविघातक प्रवृत्तींच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवून या वादाला जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत आला आहे. मात्र, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी या प्रकाराला स्पष्टपणे फेटाळून लावत समाजाला एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे.

या घटनेदरम्यान, अलका ससाणे यांचे पती रामदास शंकर ससाणे हे मद्यधुंद अवस्थेत वादाबाबत माहिती घेण्यासाठी घरासमोर गेले होते. परंतु, दगडाला पाय अडकल्याने ते सिमेंटच्या रस्त्यावर जोरात पडले आणि डोक्याला गंभीर इजा झाली. या इजेमुळे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी स्पष्ट केले की, रामदास ससाणे यांच्या मृत्यूचा आणि दोन गटांतील वादाचा कोणताही संबंध नाही.

मृत रामदास ससाणे यांच्या पत्नी अलका ससाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, काही समाजविघातक तत्वांकडून या घटनेला चुकीचा रंग देऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, दोन्ही समुदाय अनेक वर्षांपासून एकत्रित राहत असून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले आहेत.

मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या मुलाला (महेश ससाणे) फोनद्वारे अफवा पसरवण्यासाठी दबाव आणला जात आहे. परंतु, कुटुंबीयांनी कोणत्याही वादात अडकण्याची इच्छा नसल्याचे सांगितले आहे.

ससाणे कुटुंबीयांनी आपल्या प्रसिद्धीपत्राद्वारे समाजाला एकत्रित राहण्याचे आवाहन केले आहे. “ही घटना आणि वाद यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. समाजात शांतता आणि सलोखा टिकून राहावा, हीच आमची अपेक्षा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
श्रीगोंदा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास केला आहे. घटनास्थळी कोणताही कट किंवा षड्यंत्र असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालेले नाही.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

पोलीस प्रशासन आणि मृताचे कुटुंबीय आणि इतर जे लोक पोस्ट मार्टम रिपोर्ट दाबण्याचा आणि खोटी माहिती पसरवण्याच्या प्रयत्न करत आहेत आणि खोटा तपास करत आहेत ते सर्व अट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हेगार आहेत आणि सर्वांवर कारवाई होणार.
Ok