दि.२२ मे पासून श्रीगोंदा आगारातून प्रवाशांसाठी एस.टी. धावणार.

दिनांक २१ मे,श्रीगोंदा:

शासन निर्णयानुसार व मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने राज्यात जिल्हांतर्गत एस.टी. बससेवा सुरू करण्यास आवश्यक त्या नियमांचे पालन करून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ श्रीगोंदा आगारातून ठराविक मार्गावर एस.टी. बसच्या काही फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

त्यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. प्रत्येक बसमध्ये एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० % प्रवाशी राहतील.एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशी असतील. ६५ वय वर्षावरील जेष्ठ नागरिक व १० वय वर्षा खालील लहान मुले यांना केवळ अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासास परवानगी देण्यात येईल. बस मार्गावर पाठविताना पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून पाठविण्यात येईल. बस स्थानकावर प्रवाशांनी मास्क लावणे बंधनकारक असेल. बसस्थानकावर आवश्यक ते सामाजिक अंतर ठेवूनच प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात येईल.

ज्या मार्गावर बस फेऱ्या सुरू होतील,त्या फेऱ्यांची वेळेनुसार माहिती पुढीलप्रमाणे:

श्रीगोंदा ते अहमदनगर (पारगाव मार्गे):
वेळ – ८.०० , १०.०० , १२.०० ,१५.००

अहमदनगर ते श्रीगोंदा (पारगाव मार्गे):
वेळ:- १०.०० , १२.०० , १४.०० ,१७.००

श्रीगोंदा ते कर्जत:
वेळ :- ९.००( कुळधरण मार्गे ), १२.०० (वालवड मार्गे), १५.०० (कुळधरण मार्गे),

कर्जत ते श्रीगोंदा:
१०.३० ( कुळधरण मार्गे ), १३.३० (वालवड मार्गे), १७.३० (कुळधरण मार्गे)

वरीलप्रमाणे सध्या प्रवाशांच्या सोईसाठी बसेस चालविण्यात येतील. तरी श्रीगोंदा तालुक्यातील व परिसरातील सर्व प्रवाशांनी एस.टी बस सेवेचा लाभ घ्यावा.केवळ आवश्यकता असल्यासच प्रवास करावा. असे आवाहन श्रीगोंदा आगार व्यवस्थापक प्रविण शिंदे व वाहतूक निरीक्षक रोहित रोकडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading