पारनेर सैनिक बँकेची बदनामी थांबवा..श्रीगोंदा येथे निषेध मोर्चा..

दिनांक १६ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

सैनिक बँकेच्या अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी तसेच बँके विरुद्ध पारनेर पोलीस स्टेशन येथे खोट्या तक्रारी करून, खोटा गुन्हा दाखल केल्याबाबत, पुरुषोत्तम शहाणे रा.सुपा ता.पारनेर यांच्याविरुद्ध व शहाण्यांची सोबत असणारी अन्याय निवारण समितीच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलिस निरीक्षक व श्रीगोंदा तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे शहाणे यांच्या शहाणपणा विरुद्ध बँकेची बदनामी व बँकेच्या अधिकारी पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची बदनामी केल्याबाबत निषेध निवेदन काल दिनांक १५ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे.

यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील सैनिक बँकेचे सभासद बाळासाहेब गांधी, अमोल शेलार, संदिप उमाप, सतिष मखरे, राणा खेतमाळीस, विठठल खेडकर, पुरुषोत्तम लगड, शंकर सोमवंशी, दत्तात्रय वाळके, नंदराम राहिज उपस्थित होते.

स्रोत:(अमोल शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading