साखर कामगाराच्या मुलांनी फुलवली हायटेक शेती..

श्रीगोंदा फॅक्टरी येथील साखर कारखान्यातील साखर कामगाराचा भूमिहीन मुलगा मधुकर रामभाऊ काळाणे याने कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यवसायातून किफायतशीर शेती करण्याचे व्हिजन मिळाले. श्रीगोंदा फॅक्टरी येथील सहा एकदाच्या पडीक शेतीत नंदनवन निर्माण केले आहे.

रामभाऊ काळाणे हे श्रीगोंदा साखर कारखान्यात शिपाई म्हणून काम करत होते. ते सेवानिवृत्त झाले अशोक व मधुकर ही दोन मुल श्रीगोंदा फॅक्टरीवर प्रपंच मांडण्यासाठी सुध्दा स्वताची जागा नव्हती अशा परिस्थितीत शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांच्या माध्यमातून मधुकर काळाणे याने एका इस्त्राईल अँग्रो कंपनीत पाच हजार पगारावर मार्केटींग असिस्टंट म्हणून, नोकरी पत्करली आणि रोजीरोटीसाठी श्रीगणेशा सुरू केला. पण, त्या पगारावर प्रपंच कसा चालवयाचा असा प्रश्न असला तरी अनुभव पाठीशी जमा होत होता. ही जमेची बाजू होती.

मार्केटींग करताना मधुकर यांचा अनेक शेतकऱ्यांचा संबंध आला. कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिशा मिळाली आणि अवघ्या दहा हजार भांडवलावर दहा वर्षापूर्वी श्रीगोंदा फॅक्टरी वर व्यवसाय सुरू केला. प्रामाणिकपणा आणि संपर्क यामुळे व्यवसायात सुर सापडला काष्टी, श्रीगोंदा येथे कृषीसेवा केंद्र सुरु केले व अशोकराव नी राजकारणात काम करण्यास सुरूवात केली लिंपणगावचे उपसरपंच होण्यापर्यंत मजल मारली.

शेतीत बदल आणि अर्थकारण विचारात घेऊन दोन वर्षांपूर्वी मधुकर ने श्रीगोंदा फॅक्टरी वर सहा खराब जमीन खरेदी केली. आणि शेतीत कुंटूबासाठी रोजगार निर्माण केली.

सहा एकराचा मळा फुलविताना दोन एकरात सुपर भगवा डाळिंबाची १३×९ फुटावर लागवड केली. मशागत खते औषधांचा खर्च काढण्यासाठी अंतर पिकाचे नियोजन केले सुरूवातीला ढोबळी मिरचीचे अंतरपिक डाळिंबात घेतले. पण, जादा पाऊस झाल्याने मिरची पीक वाया गेले. त्यावर स्वस्त न बसता पुन्हा त्याच बेडवर फ्लॉवर आणि साधी मिरचीचे दुहेरी अंतरपिक घेतले हे पिक यशस्वी झाले. शेजाऱ्याच्या दोन एकरात सव्वा दोन लाखाचे कलिंगड आणि काकडीचे पिक घेतले. आता दीड एकरात नेट व म्लचिंगचा पेपरचा वापर करून टरबुजाची लागवड यशस्वी पद्धतीने केली आहे. नंतर सर्व पिकांचे अंतरपिक पध्दतीने पिकाचा फार्मुला वापरला. सर्व शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ठिबक सिंचन बसविले त्यामुळे पाणी आणि खताचे नियोजन करण्यासाठी मोठी मदत झाली आहे. ही शेती साखर कारखान्यापासून अवघ्या पाचशे सहाशे फुट अंतरावर आहे प्रदुषणचा परिणाम होत, असताना काळाणे बंधूंनी फळे व भाजीपाल्याची शेती करण्यासाठी यशस्वी सुरूवात केली.

संदेश

व्यवसायातून शेतीचे व्हिजन वडिलोपार्जित बेलवंडीला शेती होती. ही शेती विकली. शेती घेण्याची प्रबळ इच्छा होती. पुरेसे भांडवल तयार होताच, नफ्या तोट्याचा विचार न करता, सहा एकरशेती खरेदी केली. भाजीपाला व डाळिंब शेती यशस्वीपणे करण्यासाठी दिशा मिळाली आहे. यामध्ये बंधू अशोकचे मोठे योगदान आहे. कृषी सेवा केंद्राच्या व्यवसायातून शेती करण्याचे व्हिजन मिळाले आहे. भविष्यात या ठिकाणी पॉलिहाऊस मधील शेती करण्याचे स्वप्न आहे. मधुकर काळाणे,श्रीगोंदा फॅक्टरी

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading