दुष्काळाचे वर्षानुवर्षे चटके सहन करणाऱ्या कोंडेगव्हाण येथील २० एकर माळरानावर महाविद्यालयीन शिक्षण घेणारा २० वर्षीय सोनार समाजातील तरूण महेश राजेंद्र कुलथे याने लिंबोणी, झेंडू, गुलछडी, तुर, उस आदि पिके घेऊन सोन्यासारखी शेती फुलविली असुन डिजीटल इंडीया जमान्यात हायटेक शेती करून शेतीत करिअर करण्याचा संकल्प केला आहे.
राजेंद्र बबन कुलथे यांना कोंडेगव्हाण येथे २० एकर शेती पण दुष्काळामुळे शेती फक्त डोळ्यानी पाहायची पोटा पुरते धान्य पिकत नव्हते ज्वेलरीचा व्यवसाय करण्यासाठी कोळगाव मध्ये बिहाड मांडले मंदाताईशी राजेंद्रचा दि. १८ मे १९९० रोजी विवाह झाला राजेंद्र कुलथेची संसाराची इनिंग सुरू झाली. स्वप्नील, महेश व पुजा ही तीन मुल झाली. स्वप्नीलने बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मध्ये बी.एस्सी.बायोटेक केले. कृषी स्प्रे पंपाचा व्यवसाय सुरू केला आणि महेशनी बारावी सायन्स केले.बी.एस.सी.साठी पुणे विद्यापीठात बाहेरून प्रवेश घेतला पण शिक्षणात डोळ्यासमोर कोंडेगव्हाणची माळरान शेतीवर त्या परिसरातील माणसं दिसत होती. पाण्याचा अभ्यास करून सन २०१५ यामध्ये १५४१६ फुट अंतरावर साईसरबती लिंबोणीची लागवड केली शेतीत एंट्री केली सुरूवातीला मजुरावर शेती मोबाईल सल्ला पण शेती तोट्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली महेशने स्वत : दररोज बारा तास उभे राहण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी लिंबोणी बरोबर पाच एकर तुर केला अडीच लाख मिळाले, तीन एकर झेंडू केला सुमारे पाच लाख सत्तर हजार मिळाले त्यामधून २५ % चा उत्पादन खर्च जाता बाकी नफा मिळाला आणि महेश चा उत्साह वाढला.
२० एकर शेतीत तीन विहीरी एक बोअर हे उन्हाळ्यात तीन महिने कोरडे पडते १००x१०० फुट आकाराचे शेततळे आहे एवढ्या पाण्यावर शेतीचे नियोजन केले आहे. सन २०१५ मध्ये लावलेली लिंबोणीच्या झाडांना दोन वर्षांत पहिला बहर आला आहे. शिवाय यंदा चार एकर ऊस आणि अर्धा एकर गुलछडी लागवड केली आहे. शिवाय पाच एकर तुर केली आहे. त्यामुळे माळरानचे चित्र बदलून गेले आहे. त्याचे समाधान महेशच्या चेहऱ्यावर आहे. महेश पुण्यात शिक्षण करत आहे. सारा जीव शेतीत असतो दररोज सकाळी सात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शेती दुपारी पुस्तकांचे वाचन आणि फक्त परिक्षेला पुण्याला जाणे परिक्षा पास होणे.
महेशच्या वडीलांचे कोळगाव मध्ये छोटेशे ज्वेलरीचा व्यवसाय आहे. पण त्याकडे तो डोकूनही पाहत नाही फक्त कोंडेगव्हाणची मातीत आणि या मातीत उभे राहिलेले पिक हेच त्याचे विश्व झाले आहे.
संदेश
डिजीटल इंडीया ची जाहीरातबाजी जोरात चालू आहे. पण शासन सर्व तरूणांना नोकऱ्या देऊ शकत त्यामुळे शेतीत करिअर करण्याची मोठी संधी आहे याचा अभ्यास करून मी शेतीत करिअर करण्याचा संकल्प केला आहे. स्व : ता लक्ष घातले असून पुर्ण वेळ देत आहे. त्यामूळे यशाचे किरण दिसू लागले आहेत. तरूणांनी व्यवसायीक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून शेती केली तर शहरी भागातील नोकरी पेक्षा शेती भारी जाईल माझा विश्वास आहे. महेश कुलथे कोंडेगव्हाण
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशनाच्या वेळेची आहे.
