दिनांक २३ मार्च (काष्टी,श्रीगोंदा):
काष्टी येथील मा.ना.श्री.बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परीक्रमा’ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्ष बी.फार्मसी मधील विद्यार्थी जिपॅट-२०२१ परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.

संपूर्ण भारतामधून एकाच वेळी घेतली जाणारी आणि एम.फार्मसी प्रवेशासाठी अतिशय अवघड अशी समजली जाणारी जिपॅट-२०२१ परीक्षेमध्ये परिक्रमा बी. फार्मसी महाविद्यालयांमधील कु.तुपे सुरज अंकुश (GPAT score: २२०), कु.बागवान मुबीन (GPAT score:१७०), कु.झंजे अविनाश (GPAT score:१६७), कु.पठाण वासिम (GPAT score:१६६), कु.लगड मंगेश (GPAT score:१६५), कु.देवकर गणेश (GPAT score:१५४), आणि कुमारी सोनवणे सोनिया (GPAT score:१२५) यांनी उत्कृष्ट यश संपादित केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची चांगल्या पद्धतीने तयारी व्हावी म्हणून, परिक्रमा बी. फार्मसी मधील सर्व शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
परीक्रमा शैक्षणिक संकुलात सतत दर्जेदार शिक्षणावर अधिकाधिक भर दिला जातो. हे या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामधून दिसून येत आहे. असे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रतापसिंह पाचपुते यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले.
Students of ‘Parikrama’ College of Pharmacology have achieved excellent success in GPAT-2021 examination.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे (संस्थेच्या अध्यक्षा) डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते, (मुख्य कार्यकारी अधिकारी) श्री. प्रतापसिंह पाचपुते, (मुख्य प्रशासकीय अधिकारी) प्रा.अनिल पुंड, (संकुल संचालक) डॉ. विजय पाटील, (प्राचार्य) डॉ. सुनील निर्मळ, डॉ.तानाजी दबडे, (प्राचार्य) रमेश शिंदे, डॉ. सुदर्शन गिरमकर, (प्राचार्य) मेनन यांनी अभिनंदन केले.
स्रोत:(अंकुश तुपे)
