अनेक महिन्यांपासून प्रलंबित ठिबक सिंचन व शेत तलाव अनुदानासाठी आंदोलन..

दिनांक २४ मार्च (पिसोरे खांड,श्रीगोंदा):

श्रीगोंदा तालुक्यात आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये शेतकऱ्यांना मिळणारे शेत तलाव तसेच ठिबक सिंचन अनुदान मिळाले नसल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व शेत तलाव निर्मिती केली असून, अजूनही त्याच्या खात्यावर शासनाचे अनुदान जमा झाले नसल्याने, शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शासनाने निर्देशित केलेल्या योजनांपैकी शेत तलाव व ठिबक सिंचनामुळे शेतकऱ्यांना नियोजन करून विविध पिकं घेता येतील, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत त्यातून शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने शासनाने ही योजना आखली असली. तरी, शासना मार्फत जमा होणारे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याने शेतकरी मात्र बँकेचा कर्जबाजारी झाल्याचे दिसत आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यामुळे पिसोरे खांड, श्रीगोंदा येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र रतन इंगळे व रोहिदास रामदास तोडमल यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार व तालुका कृषी अधिकारी म्हस्के यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान खात्यात जमा करावे. अन्यथा, सर्व पीडित शेतकरी बांधवांच्या वतीने इंगळे व तोडमल हे ३० मार्च २०२१ वार मंगळवार रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Movement for subsidy for drip irrigation and farm pond pending for many months.

याबाबत त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सन २०१९-२० या आर्थिक वर्षात व त्यापूर्वीचे शेत तलाव व ठिबक सिंचनाचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून, शासन व प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. अनेक गरीब शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेत तलाव, ठिबक सिंचन घेतले आहेत. अजूनही कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. तात्काळ शेतकऱ्यांचे हे नमूद अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावे. अन्यथा, शेतकरी वर्गाच्या वतीने मंगळवार दिनांक ३० मार्च २०२१ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये धरणे आंदोलन करणार असल्याचे, महेंद्र रतन इंगळे व रोहिदास रामदास तोडमल (पिसोरे खांड, श्रीगोंदा) यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास कळविले आहे. राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडे तसेच जिल्हाधिकारी, अहमदनगर व पोलीस निरीक्षक, अहमदनगर यांनाही या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आलेल्या आहेत.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading