विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घ्यावा’ – सत्यजित मच्छिंद्र..

दिनांक २ जुलै २०२४,श्रीगोंदा:

रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जीवाजीराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला.

जाहिरात..

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्रीगोंदा तालुका गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनात शिक्षकांचा आदर करावा, करिअर करण्यासाठी प्रयत्नवादी रहावे, तसेच महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घ्यावा, असे उद्गार काढले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश साळवे होते. प्र. प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक पालक बंधू-भगिनी उपस्थित होते.

उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे यांनी आभार मानले, तर डॉ. राम ढगे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी प्रा. बाळासाहेब शेटे, प्रा. अरुण जाधव, प्रा. अर्जुन वाघ, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading